फौजिया खान यांचा राज्यसभेत मराठी बाणा; सभागृहात मायबोलीत मांडल्या रेल्वेच्या समस्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 13:12 IST2022-03-16T13:11:52+5:302022-03-16T13:12:18+5:30
विशेष उल्लेखाद्वारे फौजिया खान यांनी मराठीतून मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले

फौजिया खान यांचा राज्यसभेत मराठी बाणा; सभागृहात मायबोलीत मांडल्या रेल्वेच्या समस्या
परभणी : कोरोनाच्या काळात बंद केलेल्या रेल्वे प्रवाशांच्या सवलती पूर्ववत कराव्या, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी मंगळवारी राज्यसभेत केली.
विशेष उल्लेखाद्वारे फौजिया खान यांनी मराठीतून मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून रेल्वे प्रवाशांच्या सर्व सेवा रद्द केल्या होत्या. आता रेल्वे सेवा पूर्ववत झाल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, १२ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी तिकिटासाठी सवलती दिल्या जात होत्या. परंतु या सवलती अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. महागाईच्या काळात या सवलती दिल्यास त्यांना तत्काळ दिलासा मिळेल. तरी सरकारने या सर्व सवलती पूर्ववत सुरू कराव्या, अशी मागणी फौजिया खान यांनी केली.