शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी कराव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST2021-03-24T04:15:40+5:302021-03-24T04:15:40+5:30
पालम : तालुक्यात २१ व २३ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले ...

शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी कराव्यात
पालम : तालुक्यात २१ व २३ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीच्या तक्रारी शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या ॲपवर कराव्यात, असे आवाहन कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा व गहू ही पिके काढणीला आली असताना २१ व २३ मार्च रोजी तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी काळी तर गहू पांढरा पडण्याची भीती व्यक्त होत आहे. ज्या शेतकऱ्यांचे या पावसामुळे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीच्या ॲपवर नुकसानीबाबतच्या तक्रारी कराव्यात, असे आवाहन तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.