पाथरीत कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:07 IST2019-06-18T17:04:16+5:302019-06-18T17:07:50+5:30
फासाटे यांना दोन मुली आणि एक मुलगा असे अपत्ये आहेत

पाथरीत कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
पाथरी (परभणी ) : कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. १७) पहाटे तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली आहे. गुणाभाऊ मारोतराव फासाटे (५०)असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गुणाभाऊ मारोतराव फासाटे यांना ४ एकर जमीन असून स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा पाथरीचे ३ लाख रुपयांचे कर्ज आहे. फासाटे यांना दोन मुली आणि एक मुलगा असे अपत्ये असून दोन वर्षापूर्वी एका मुलीचे लग्न झाले. दुसरी मुलगीही लग्नास आली आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, याची त्यांना चिंता लागली होती. त्यातूनच सोमवारी (१७ जून) पहाटे त्यांनी विष प्राशन केले. ही माहिती समजताच नातेवाईकांनी गुणाभाऊ यांना तातडीने परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.