नाकाबंदीदरम्यान पोलिसांच्या तपासणीत युवकाकडे आढळले शस्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 16:43 IST2021-05-22T16:43:03+5:302021-05-22T16:43:44+5:30

Crime in Parabhani पोलिसांनी दुचाकीवरील दोघांची तपासणी केली, तेव्हा एका आरोपीजवळ धारदार चाकू आढळला.

During the blockade, the police found a weapon in the possession of the youth | नाकाबंदीदरम्यान पोलिसांच्या तपासणीत युवकाकडे आढळले शस्त्र

नाकाबंदीदरम्यान पोलिसांच्या तपासणीत युवकाकडे आढळले शस्त्र

ठळक मुद्देशहरात पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनधारकांची तपासणी सुरू केली आहे.

परभणी : शहरातील शिवाजी चौक भागात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एक आरोपीकडे धारधार चाकू आढळला. याप्रकरणी दोन्ही युवकांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरात पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनधारकांची तपासणी सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविली जात आहे. २१ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास येथील शिवाजी चौक परिसरात नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांची तपासणी केली जात असताना जनता मार्केट भागातून एक दुचाकी शिवाजी चौकात दाखल झाली. 

पोलिसांनी दुचाकीवरील दोघांची तपासणी केली, तेव्हा एका आरोपीजवळ धारदार चाकू आढळला. याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात आरोपी रमीज अहमद खान आणि अब्दुल मोईज अहमद या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चाकू आणि एक मोटरसायकल जप्त केली आहे. पोलीस कर्मचारी राजेश्वर पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: During the blockade, the police found a weapon in the possession of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.