वाहन चालकांनी वाहतूक नियमाविषयी सजग असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST2021-02-06T04:29:57+5:302021-02-06T04:29:57+5:30
देवगावफाटा येथे रस्ता सुरक्षा मोहीम देवगावफाटा: भारतीय संविधानाने दिलेले हक्क मागतांना वाहन चालकांनी वाहतूक नियमाशी सजग असणे ...

वाहन चालकांनी वाहतूक नियमाविषयी सजग असावे
देवगावफाटा येथे रस्ता सुरक्षा मोहीम
देवगावफाटा: भारतीय संविधानाने दिलेले हक्क मागतांना वाहन चालकांनी वाहतूक नियमाशी सजग असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महामार्ग पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड यांनी केले आहे.
देवगावफाटा येथे महामार्ग पोलीस पथकाच्या वतीने आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कार्यक्रमात महामार्ग पो.उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड बोलत होते. याप्रसंगी सुरेश मुटेकर,शेख शकील,नवनाथ लोखंडे,भारत निंबाळकर यांची उपस्थिती होती. औरंगाबाद - नांदेड महामार्गावर देवगावफाटा येथे महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोहीम सुरू केली. या प्रसंगी वाहतूक नियमांची जनजागृती व अंमलबजावणी करीता पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यावेळी बोलताना पो.उपनिरीक्षक गायकवाड म्हणाले की,वाहन चालकांनी स्वयंस्फूर्तीने वाहतूक नियमांचे पालन करावे तसे झाले तर महामार्ग पोलीस यंत्रणेवरील कामाचा ताण कमी होईल असे, त्यांनी सांगितले.