मानवतच्या कोल्हा शिवारात टोमॅटोचा सडा; ट्रकच्या अपघातात चालक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 18:09 IST2019-05-06T18:07:52+5:302019-05-06T18:09:52+5:30
वळण रस्त्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले

मानवतच्या कोल्हा शिवारात टोमॅटोचा सडा; ट्रकच्या अपघातात चालक गंभीर जखमी
मानवत (परभणी ) : राष्ट्रीय महामार्गावर कोल्हा शिवारात टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने त्यातील टोमॅटो रस्त्यावर पसरली. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात वाहनचालक गंभीर जखमी आहे.
औरंगाबाद येथून एक आयशर ट्रक ( एम एच २० डीई ९०७९ ) परभणीच्या बाजारपेठेत टोमॅटो विक्रीसाठी घेऊन जात होता. कोल्हा शिवारात नविन वळण रस्त्यावर ट्रक आला असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक उलटला आणि त्यातील टोमॅटो रस्त्यावर पसरली. यात ट्रकचा वाहन चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर मानवतकडे जाणाऱ्या नविन वळण रस्ता धोकादायक पद्धतीने बांधण्यात आल्याने येथे दररोज अपघात होत असतात असा आरोप कोल्हा येथील गावकऱ्यांनी केला आहे.