शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

राजीनामा द्यायचा असेल तर दिल्लीला जाऊन द्या, नाटक नको; परभणीतील शिवसैनिकच शिवसेना खासदारावर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 6:24 PM

एकीकडे शिवसैनिकांवर अन्याय होतो म्हणून राजीनाम्याचे नाटक करायचे आणि दुसरीकडे सुडबुद्धीने शिवसैनिकांवर अन्याय करायचा हे योग्य नाही.

ठळक मुद्देशिवसेनेच्या गंगाखेड विधानसभा प्रमुखांचा गंभीर आरोपशिवसैनिकांवरच अन्याय केल्याची केली तक्रार

गंगाखेड: लोकसभा निवडणुकीसाठी जीवाचे रान करणाऱ्या शिवसैनिकांवर सुडबुद्धीने अन्याय करायचा आणि दुसरीकडे शिवसैनिकांवरच अन्याय झाल्याचा कांगावा करायचा, मग राजीनाम्याचे नाटक करायचे. राजीनामा द्यायचाच असेल तर दिल्लीला जावून द्या, अशी गंभीर टिका शिवसेनेचेच गंगाखेड विधानसभाप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती बाळासाहेब निरस यांनी खा.बंडू जाधव यांच्यावर गुरुवारी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यात गळचेपी होत असल्याच्या कारणावरुन परभणीचे शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीने मात्र खा. जाधव यांचे आरोप फेटाळत भाजपाला पोषक वातावरण बनविण्यासाठी सारा खटाटोप ते करीत असल्याचा पलटवार केला होता. या वादात आता गंगाखेड बाजार समितीचे सभापती तथा  शिवसेनेचे विधानसभाप्रमुख बाळासाहेब निरस यांनीही उडी घेतली आहे. या अनुषंगाने निरस यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यात ते म्हणतात गंगाखेड बाजार समितीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावास विरोध करुन खा. जाधव यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे मुदतवाढ रोखण्याचे निवेदन दिले. लोकसभा निवडणुकीत त्यांचे आम्ही काम केल्याच्या उपकाराची त्यांनी परतफेड केली. उपमुख्यमंत्री अजीत पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आघाडीचा धर्म पाळून सोनपेठ, पाथरी, गंगाखेड या तिन्ही बाजार समित्यांना मुदतवाढ देण्याचे प्रस्ताव सकारात्मकतेने मागवून घेतले असताना खा. जाधव यांनी राजकीय हस्तक्षेप करुन खोडा घालण्याचे राजकारण केले.

आम्ही लोकसभेच्या वेळेस राजकीय मदत करायची आणि आमची वेळ आली की, खासदारांनी विरोध करायचा, ही संतापजनक पद्धत आहे. उलट लोकसभेला ज्यांचा  प्रचार केला नाही, त्यांनी आम्हास मुदतवाढीसाठी मदत केली. त्याला दूरदृष्टीचे राजकारण म्हणतात. एकीकडे शिवसैनिकांवर अन्याय होतो म्हणून राजीनाम्याचे नाटक करायचे आणि दुसरीकडे सुडबुद्धीने शिवसैनिकांवर अन्याय करायचा हे योग्य नाही. राजीनामा द्यायचाच असेल तर दिल्लीला जावून द्या, असेही सभापती निरस यांनी ठणकावले आहे. या अनुषंगाने ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

परभणीत राष्ट्रवादी भवन तोडफोड प्रकरणी चौघांवर गुन्हा

राष्ट्रवादीच्या गळचेपीमुळे राजीनामा देणाऱ्या खासदाराला उद्धव ठाकरेंनी केला फोन; म्हणाले...

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Jadhavसंजय जाधवNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा