नालीवरील ढापे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:17 IST2021-02-12T04:17:00+5:302021-02-12T04:17:00+5:30

स्वच्छतेकडे दुर्लक्ष परभणी : येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारावर मनपाच्या वतीने सार्वजिनक स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. परंतु, गेल्या अनेक ...

Drain covers disappear | नालीवरील ढापे गायब

नालीवरील ढापे गायब

स्वच्छतेकडे दुर्लक्ष

परभणी : येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारावर मनपाच्या वतीने सार्वजिनक स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून या स्वच्छतागृहाची मनपाकडून स्वच्छता करण्यात आली नाही. त्याुमळे दुर्गंधी पसरली आहे..

कर्मचारी गायब

परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील काही कर्मचारी दुपारच्या वेळी अचानक गायब होत आहेत. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागिरकांमधून करण्यात येत आहे.

पार्किंगचा बोजवारा

परभणी : येथील प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असलेल्या मैदानात वाहनधारक अस्ताव्यस्त वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सातत्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याबाबत संबंधित वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात ३७ शाळा एक शिक्षकी

परभणी : जिल्ह्यात एकच शिक्षक असलेल्या एकूण ३७ शाळा आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या २४ शाळांचा समावेश आहे. याशिवाय खासगी विनाअनुदानित दहा, तर खासगी अनुदानित दोन शाळांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.

अतिक्रमण वाढले

परभणी : येथील हैदराबाद बँक परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष दिले नसल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. याकडे मनपाच्या संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अरुंद नाली

परभणी : येथील जिल्हा बँकेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या नालीची रुंदी भराव टाकून कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ही नाली तुंबत आहे. प्रशासनाच्या वतीने याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाली तुंबण्याची शक्यता आहे.

Web Title: Drain covers disappear