शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

प्राणवायूची मागणी निम्म्याने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST

परभणी : कोरोनापाठोपाठ जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या ७.६ के. एल. ऑक्सिजन लागत असून, जिल्ह्यात ३९ ...

परभणी : कोरोनापाठोपाठ जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या ७.६ के. एल. ऑक्सिजन लागत असून, जिल्ह्यात ३९ के. एल. ऑक्‍सिजनचा साठा आता उपलब्ध आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खाटांची सुविधा उपलब्ध केली होती. कोविड रुग्णालयांमधून या रुग्णांवर उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे, कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करावा लागत होता. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत जिल्ह्यात ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. एप्रिल महिन्यात दररोज १४ के. एल. ऑक्सिजन जिल्ह्यासाठी लागत होता. मात्र त्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाची मोठी धावपळ झाली होती.

कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात घेतला आहे. नवीन रुग्णांचे प्रमाण कमी झाले असून, कोरोना रुग्णालयातही रुग्णांअभावी खाटा रिक्त होत आहेत. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांत मिळून ३३४ रुग्णांना ऑक्सिजन दिला जात आहे. दररोज केवळ ७.६ किलोलिटर ऑक्सिजनची आवश्यकता भासत असून, त्या तुलनेत जिल्ह्यात २९.०३ के. एल. ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त जम्बो सिलिंडर आणि ऑक्सिजन प्रकल्पांमधूनही मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर येणारा ताण बऱ्याच अंशी आता कमी झाला आहे.

३९ किलो ऑक्सिजन उपलब्ध

जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनच्या साठा करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये २० के. एल. आणि जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटल आणि आयटीआय येथील कोरोना रुग्णालयात प्रत्येकी १० के. एल. अशी ५० के. एल. ऑक्सिजन साठवणुकीची क्षमता आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. प्रत्यक्षात ३९.०३ के. एल. ऑक्सिजन साठा सध्या उपलब्ध आहे. जिल्ह्यातील रुग्णांना दररोज किंवा ७.६ के. एल. ऑक्सिजनची आवश्यकता असून, याव्यतिरिक्त तीनही रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या जम्बो सिलिंडरमध्ये ४१ लाख एक हजार लिटर ऑक्सिजन सध्या उपलब्ध आहे.

रुग्णांची संख्या घटल्याने दिलासा

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असून, रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांकडून ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थिती समाधानकारक होत असल्याने दिलासा मिळत आहे.

ऑक्सिजनची स्थिती

उपलब्ध ऑक्सिजन - ३९.०३ के. एल.

ऑक्सिजनवरील एकूण रुग्ण - ३३४

जंबो सिलिंडरमधील ऑक्सिजन - ४१ लाख लिटर