वसमत रोडवर टँकरच्या धडकेत मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 19:19 IST2018-04-12T19:19:16+5:302018-04-12T19:19:16+5:30
शहरातील वसमत रस्त्यावर टँकरची दुचाकीला जोराची धडक बसल्याने एक १४ वर्षीय मुलगा जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.

वसमत रोडवर टँकरच्या धडकेत मुलाचा मृत्यू
परभणी : शहरातील वसमत रस्त्यावर टँकरची दुचाकीला जोराची धडक बसल्याने एक १४ वर्षीय मुलगा जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. शेख वसीम शेख खलील असे मयत मुलाचे नाव आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी, शेख वसीम शेख खलील हा येथील गाडीवान मोहल्ल्यातील रहिवासी असून सायंकाळी तो शहरातून वसमतकडे दुचाकीने ( एम.एच.२२-ई-४४४२ ) जात होता. याचवेळी वसमतकडून टँकर (एम.एच.२०-सीटी ७४४४ ) शहरात येत होता. शहरानजीक असलेल्या जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ दुचाकीला टँकरने पाठीमागून धडक दिली. जात शेख वसीम शेख खलील याच्या डोक्याला जबर मार लागला. दरम्यान, घटनेनंतर शेख वसीम यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.