शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : गंगाखेडमध्ये बाहेरगावाहून आलेली तिघे कोरोना संशयीत; विलगीकरण कक्षात उपचार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 17:25 IST

कोरोनाचे तीन संशयीत शहरात आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देएकास परभणी येथे हलविले दोघांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरु

गंगाखेड: पुणे, सौदी अरेबिया येथून व परराज्यातून शहरात आलेले तिघे सर्दी, खोकला, ताप तसेच घशाच्या खवखवीने त्रस्त झाल्याने कोरोनाच्या संशयाने त्यांना उपचारासाठी येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. यातील एकास परभणी येथे पाठविण्यात आले तर दोघांना डॉक्टरांच्या निगराणीखाली विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोनाचे तीन संशयीत शहरात आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. यासोबतच मोठ्या शहरात उद्योग व्यवसायांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने तेथील कामगार गावी परतत आहेत. यातच सौदी अरेबिया येथे कामासाठी असलेल्या भारतीय नागरीकांना तेथून परत पाठविण्यात येत आहे. यामुळे शहरात बाहेर गावाहून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यातच पुणे, सौदी अरेबिया आणि पर राज्यातून परतलेल्या तिघांना सर्दी, ताप आणि घशात खवखव असा त्रास जाणवत होता. यामुळे कोरोनाच्या संशयावरून त्यांना येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. 

येथे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा गौस, डॉ. केशव मुंडे यांच्या निगराणीखाली संशयितांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांचे स्वॅबचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोनाचे संशयीत आढळून आल्याची माहिती समजताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी