परभणीत काँग्रेसचे उपोषण आंदोलन सुरू; प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची उपस्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 13:29 IST2018-04-09T13:29:39+5:302018-04-09T13:29:39+5:30

काँग्रेस पक्षाच्या उपवास आंदोलनाला आज सकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरुवात झाली.

Congress begins fasting in Parbhani; State President Ashok Chavan's presence | परभणीत काँग्रेसचे उपोषण आंदोलन सुरू; प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची उपस्थिती 

परभणीत काँग्रेसचे उपोषण आंदोलन सुरू; प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची उपस्थिती 

परभणी :  काँग्रेस पक्षाच्या उपोषण  आंदोलनाला आज सकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरुवात झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

देशात सामाजिक सलोखा रहावा, यासाठी काँग्रेस  पक्षाच्यावतीने देशपातळीवर एक दिवसाचे उपोषण आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपवास आंदोलन सुरू करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनाची सुरुवात झाली. यात सहभागासाठी जिल्हाभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते सकाळीच शहरात दाखल झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी खा.तुकाराम रेंगे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, महापौर मीनाताई वरपूडकर, मनपाचे सभागृह नेते भगवान वाघमारे, स्थायी समितीचे सभापती गणेश देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा जयश्रीताई खोबे, लियाकत अली अन्सारी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पंडितराव चोखट, रामभाऊ घाटगे, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार आदींसह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाली. 

Web Title: Congress begins fasting in Parbhani; State President Ashok Chavan's presence