शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा मंडळात ढगफुटी; अडीच तासात 140 मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 17:40 IST

अतिवृष्टीमुळे तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा, थुना नद्यासह ब्रम्हणाळ, पिंगलगड यासारख्या लहान ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीने शेतीतील सखल भागात पाणी साचले आहे.पांगरा, वडगाव आहेरवाडी या भागातील शेत रस्ते काही काळासाठी बंद

पूर्णा : सततच्या पावसाने आधीच खरीप पीके धोक्यात असताना शुकवारी ( दि 18) पहाटे पूर्णा परिसरात ढगफुटी झाली. पावसाचा वेग व थेंबाचा आकार इतका मोठा होता की पाहणाऱ्याच्या अंगावर शहारे येत होते. महसूल विभागानुसार पहाटेच्या दोन तासात साडेपाच इंच पावसाची नोंद झाली आहे.

शुक्रवारी ( दि. 18 ) पहाटे पूर्णा मंडळात ढगफुटी झाली. अडीच तासाच्या काळात 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीने शेतीतील सखल भागात पाणी साचले आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा, थुना नद्यासह ब्रम्हणाळ, पिंगलगड यासारख्या लहान ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. ग्रामीण भागातल्या ओढ्याना पाणी आल्याने  पांगरा, वडगाव आहेरवाडी या भागातील शेत रस्ते काही काळासाठी बंद झाले होते.

पहाटे दीड वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अडीच तास एक सारखा पडणारा पाऊस पाहणाऱ्यांनाही भीतीदायक ठरत होता. शहरातील सखल भागात असलेल्या काही घरात पाणी शिरले होते. तर नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या. पाटबंधारे विभागाने कनिष्ठ अभियंता पी जी रणवीर यांनी दिलेल्या माहितीवरून पूर्णा नदीच्या पात्रात कमालीची वाढ झाली आहे.

पिकांचे अतोनात नुकसान पूर्णा तालुक्यात मागील पंधरा दिवसात कमी वेळामध्ये जास्त प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे कापूस सोयाबीन यासह इतर पिकांना पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने धोका निर्माण झाला आहे. सोयाबीन पिकाच्या शेंगा झाडावर समोर येत आहेत तर कापसाची बोंडे कुजून जात आहेत हळदीची स्थितीही गंभीर असून कंदकूजण्याची स्तिथी निर्माण झाली आहे. 16 सप्टेंबरपर्यंत तालुक्यात 714 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी