एरंडेश्वर (जि. परभणी): परभणी-वसमत महामार्गावरील पूर्णा तालुक्यातील झीरो फाट्याजवळ रविवारी दुपारी कार आणि हायवा ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कारमधील श्रीराम विठ्ठलराव भिसे (रा. शिवदत्तनगर, जि. नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका जोरदार होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर हायवा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला.
घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
हायवा पलटी अन कारचा चक्काचूरमिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम भिसे हे रविवारी दुपारी आपल्या कारने (क्रमांक MH 26 CE 2369) वसमतकडून परभणीच्या दिशेने जात होते. याच वेळी परभणीकडून वसमतकडे येणाऱ्या हायवा ट्रकने (क्रमांक MH 26 H 5226) कारला जोराची धडक दिली. धडक बसताच हायवा ट्रक रस्त्यावर उलटला, तर कार पूर्णपणे दाबल्या गेल्याने भिसे यांचा जागीच अंत झाला.
पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी केली वाहतूक सुरळीतअपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पडलवाड, सुधीर काळे आणि पोलीस पाटील बापूराव राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून तासनतास अडकलेली वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
Web Summary : A car and truck collided head-on near Zero Phata, Parbhani, killing Shriram Bhise. The car was crushed, and the truck overturned. Police and villagers cleared the road, restoring traffic after hours of disruption.
Web Summary : परभणी के ज़ीरो फata के पास एक कार और ट्रक की आमने-सामने टक्कर में श्रीराम भिसे की मौत हो गई। कार पूरी तरह से कुचल गई, और ट्रक पलट गया। पुलिस और ग्रामीणों ने सड़क साफ कर यातायात बहाल किया।