सेलू- वालुर रस्त्यावर तरुणाचा जळालेला मृतदेह आढळला; नातेवाईकांकडून घातपाताचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 15:09 IST2019-06-15T15:02:50+5:302019-06-15T15:09:34+5:30
नातेवाईकांनी हा प्रकार घातपात असल्याचा आरोप केला आहे.

सेलू- वालुर रस्त्यावर तरुणाचा जळालेला मृतदेह आढळला; नातेवाईकांकडून घातपाताचा आरोप
सेलू (परभणी ) : सेलू ते वालूर रस्त्यावरील डुगरा पाटी जवळ एका पस्तीस वर्षीय युवकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर मृतदेह रस्त्यावर पडल्याने वालूर ते सेलू मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवाशी सतीश दत्तराव बरसाले ( 35) या तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेला आढळला आहे. पोलीस निरीक्षक संदीपान शेळके व त्याचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. सुञांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रम्हणगाव गाव येथील सतीश बरसाले याचे शुक्रवारी नालीच्या बांधकामावरून गावातील काही लोकांशी वाद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण गाव पातळीवर मिटवून घेण्यात आले होते. पंरतू, शनिवारी सकाळी डुगरापाटी जवळ सतीश याचा जळालेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्याच्या नातेवाईकांनी हा प्रकार घातपात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पोलीस तपासानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी सांगितले.