वाण नदीत मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 17:59 IST2021-10-05T17:58:45+5:302021-10-05T17:59:32+5:30

Boy drowned in river : आज अचानक नदी पात्रात सकाळपासून पाणी वाढले होते.

Boy drowned while going for a swim with friends in Van River | वाण नदीत मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

वाण नदीत मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

सोनपेठ (परभणी ) : शहरातून वाहणाऱ्या वाण नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या एका बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. शेख रेहान शेख आलीम (१२ ) असे मृत बालकाचे नाव आहे.  ( Boy drowned in river at Sonpeth) 

फुकटपुरा वडकर गल्ली भागात शेख रेहान शेख आलीम राहतो. दुपारी तो मित्रांसोबत वाण नदीच्या पात्रात पोहायला गेला होता. आज अचानक नदी पात्रात सकाळपासून पाणी वाढले होते. त्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात शेख रेहान हा वाहून गेला. नदीकाठी कपडे धुणाऱ्या काही महिलांनी मुलगा वाहून जात असल्याचे पाहिले. त्यांनी लागलीच मदतीसाठी परिसरातील नागरिकांना बोलावले. 

भावकीतील मुलानेच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पिडिता पाच महिन्यांची गर्भवती

मुलगा वाहून गेल्याचे समजताच परिसरातील असंख्य तरुण नदी पात्राशेजारी गोळा झाले होते. तसेच काही तरुणांनी त्याचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरून प्रयत्न केले. तब्बल एक ते दीड तासानंतर रेहानचा मृतदेह हा नदीपात्रातील एका बाभळीच्या बनात सापडला. यावेळी सोनपेठ पोलीस ठाण्याचे जमादार कुंडलीक वंजारे, वचीष्ठ भिसे, तलाठी चिकटे, नायब तहसीलदार गायकवाड तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख कृष्णा पिंगळे, शुभम सोन्नर, आनंद गुजराथी, गणेश जोशी, काँग्रेसचे सुमित पवार, राजू सौदागर, नगरसेवक उस्मान कुरेशी, दिगंबर भाडूळे, रमाकांत राठोड, कल्पेश राठोड, खाजा कुरेशी, सिद्दीक कुरेशी आदींनी मदत केली.

पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू; एकाला वाचविण्यास यश

Web Title: Boy drowned while going for a swim with friends in Van River