परभणीत दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 15:55 IST2018-06-22T15:55:57+5:302018-06-22T15:55:57+5:30

भरधाव दुचाकी कालव्यात कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पिंगळी शिवारात आज सकाळी १० च्या सुमारास घडली.

Both of them die on the spot in Parbhani | परभणीत दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

परभणीत दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

परभणी : भरधाव दुचाकी कालव्यात कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पिंगळी शिवारात आज सकाळी १० च्या सुमारास घडली. सचिन रंगनाथ येवले (वय २२), गुणाजी भागवत येवले (वय २०, दोघे रा. पिंपळगाव आयाज ता. लोहा) असे अपघातातील मृतांची नावे आहेत. 

सचिन व गुणाजी हे दोघेजण आज सकाळी परभणी येथून दुचाकीवर लोह्याकडे जात होते. त्यांची दुचाकी परभणी-पालम रोडवरील पिंगळी शिवारामध्ये आली असता जायकवाडी धरणाच्या कालव्यामध्ये कोसळली. दुचाकीचा वेग जास्त असल्याने बाजूचा कठडा तोडून दुचाकी कालव्यामध्ये पडली. यामध्ये दोंघाचाही जागेवरच मृत्यू झाला. यावेळी कालव्याला पाणी नव्हते. 

घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलीस ठाण्यातील बीट जमादार कुलकर्णी, पिंगळीचे पोलीस पाटील उमेश खाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविले आहेत. या प्रकरणी दुपारी दोन वाजेपर्यंत ताडकळस पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. 

Web Title: Both of them die on the spot in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.