वीज बील प्रश्नी भाजपाचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:01+5:302021-02-06T04:30:01+5:30

कोरोनामुळे लाॅकडाऊन झाल्यानंतर व्यवसाय ठप्प पडले. सर्व सामान्य जनतेता होरपळून निघाली. अद्यापही सर्व व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. त्यात महावितरणकडून ...

BJP's sit-in agitation on electricity bill issue | वीज बील प्रश्नी भाजपाचे ठिय्या आंदोलन

वीज बील प्रश्नी भाजपाचे ठिय्या आंदोलन

कोरोनामुळे लाॅकडाऊन झाल्यानंतर व्यवसाय ठप्प पडले. सर्व सामान्य जनतेता होरपळून निघाली. अद्यापही सर्व व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. त्यात महावितरणकडून ग्राहकांच्या माथी आव्वासव्वा वीज बिले माथी मारली आहेत. त्यामुळे वीज ग्राहक महावितरण कार्यालयात खेटे मारून हैराण झाले आहेत. ग्रामीण भागात वीजेचा प्रश्न गंभीर आहे. संदर्भात भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयाला कुलुप ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता. पंरतु, पोलिसांनी भाजप कार्यकत्याना कुलूप ठोकू दिले नाही. त्यानंतर आ. बोर्डीकर व कार्यकत्यांनी ठिय्या आंदोलन करून उपविभागीय अंभियता मुंजाजी आरगडे व कनिष्ठ अंभियता प्रवीण थोरात यांना धारेवर धरत प्रश्नाचा भडीमार केला. तसेच थकीत वीज बिलामुळे ग्राहकांची वीज तोडणी करू नये अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आ. बोर्डीकर यांनी दिला. त्यानंतर भाजपा कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, विविध मागणीचे निवेदन उपविभागीय अंभियता मुंजाजी आरगडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिशिकांत देशपांडे, माजी सभापती दिनकर वाघ, कपील फुलारी, शिवहरी शेवाळे, रावसाहेब बुरेवार, ॲड. रामेश्वर शेवाळे, भागवत दळवे, दामोदर दळवे, दीपक चव्हाण, डाॅ संजय लोंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: BJP's sit-in agitation on electricity bill issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.