शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
8
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
9
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
10
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
11
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
12
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
13
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
14
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

पालम तालुक्याच्या गोदावरी पट्यात ऊसाचे क्षेत्र वाढले, पदरमोड करून बेणे घेण्यावर शेतक-यांचा भर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 2:03 PM

पालम तालुक्यातून वाहणा-या गोदावरी नदीपात्रात यावर्षी पाण्याचा साठा उपलब्ध झाल्याने या पट्यात उसाची लागवड वाढली आहे.

ठळक मुद्देयावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने अनेक शेतक-यांनी सोयाबिन, कापसाची लागवड केली.यावर्षी परतीच्या पावसाने शेतक-यांचे नुकसान केले असले तरी रबी हंगामासाठी हा पाऊस चांगला झाला आहे. गोदावरी नदीपात्रातही पुरेसा पाणीसाठा आहे.

परभणी - पालम तालुक्यातून वाहणा-या गोदावरी नदीपात्रात यावर्षी पाण्याचा साठा उपलब्ध झाल्याने या पट्यात उसाची लागवड वाढली आहे. सध्या अनेक शेतकरी ऊस लागवड करतांना दिसून येत असून यासाठी लागणारे बेणे कारखान्याकडून न घेता पदरमोड करून घेण्याकडे शेका-यांचा कल अधिक आहे. 

पालम तालुक्यात मागील तीन वर्षात दुष्काळाची स्थिती होती़ सतत तीन वर्ष पावसाचे प्रमाण कमी असल्याने होते़ त्यामुळे खरीप हंगामासह रबी हंगामातील पिके हातची गेली होती़ यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने अनेक शेतक-यांनी सोयाबिन, कापसाची लागवड झाली. परंतु, त्यानंतर दोन महिने पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन पिकाच्या वाढीवर परिणाम झाला. शिवाय ऐन सोयाबीन काढणीच्या काळात परतीचा पाऊस झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक शेतक-यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून रबी हंगामाची पेरणी सुरू केली. आता तर कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. नगदी पिकेच हातची गेल्याने आर्थिक गणित बिघडले आहे. यावर्षी परतीच्या पावसाने शेतक-यांचे नुकसान केले असले तरी रबी हंगामासाठी हा पाऊस चांगला झाला आहे. गोदावरी नदीपात्रातही पुरेसा पाणीसाठा आहे. डिग्रस बंधा-यातही मूबलक पाणीसाठा आहे. बंधा-याचे बॅकवॉटर पाणी सावंगी भू. पर्यंत आले आहे. त्यामुळे गोदावरी पट्यामध्ये ऊस लागवडीकडे शेतकरी वळले आहेत.

याशिवाय सावंगी भू., रावराजूर, धनेवाडी, खुर्लेवाडी, उमरथडी, आरखेड, घोडा, सोमेश्वर, फळा, फरकंडा, डिग्रस, गुळखंड, जवळा आदी गावातील शेतकरी उसाची लागवड करताना दिसत आहेत. तालुक्याच्या चारही बाजूने साखर कारखाने सुरू झाल्याने उसापासून उत्पादनातील कसर भरून निघेल, असा कयास शेतकरी लावत आहेत.

पदरमोड करून बियाणाची खरेदीतालुक्यात यावर्षी उसाचे क्षेत्र प्रथमच वाढले असल्याने ऊस लागवडीसाठी कारखान्याकडून बेणे घेण्याऐवजी पदरमोड करून बेण्याची खरेदी केली जात आहे. कोणत्याही कारखान्याची ऊस नेण्यासाठी सक्ती नको, यासाठी शेतकरी हे पाऊल उचलत आहेत. यासोबतच सातबारा, ओखळपत्र, बँक पासबूक आदी कागदपत्र देतानाही शेतकरी आखडता हात घेत असतानाचे पहावयास मिळत आहे. दरम्यान, ऊस लावताना कमी कालावधीत चांगले उत्पादन देणा-या १०.००१ या जातीला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. तीन ते साडेतीन हजार प्रती क्विंटल टन हे बियाणे विकत घेत आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी