शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या ज्वारीच्या ‘परभणी शक्ती’ वाणास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:33 IST2026-02-06T16:32:47+5:302026-02-06T16:33:13+5:30

मराठवाड्याच्या 'परभणी शक्ती'ची देशात हवा! राष्ट्रीय समितीकडून ज्वारी संशोधन केंद्राचा गौरव; 'सुपर दगडी' वाण ठरणार शेतकऱ्यांचे आधारवड

Approval of 'Parbhani Shakti' variety of sorghum, which is important for farmers and gives higher yields at lower cost | शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या ज्वारीच्या ‘परभणी शक्ती’ वाणास मान्यता

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या ज्वारीच्या ‘परभणी शक्ती’ वाणास मान्यता

नांदेड : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या ज्वारी संशोधन केंद्राने ‘परभणी शक्ती’ या आपल्या दर्जेदार संशोधनामुळे राष्ट्रीयस्तरावर पुन्हा एकदा आपली ओळख सिद्ध केली. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे ज्वारीचे हे वाण आहे. गत पाच वर्षांतील कामकाजाचा आढावा घेणाऱ्या पंचवार्षिक आढावा समितीने (क्यूआरटी) केंद्राला ‘उत्कृष्ट, समाधानकारक आणि प्रशंसनीय’ असा अभिप्राय देऊन गौरविले.

यशामध्ये कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांच्या नेतृत्वाचा वाटा असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित वाण विकास आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाचे कार्य प्रभावीपणे राबविले. हवामान बदलाला सामोरे जाणाऱ्या ज्वारीच्या नवीन जाती, कमी खर्चात अधिक उत्पादनासाठी विकसित केलेले तंत्रज्ञान, प्रयोगशाळेतील संशोधन थेट बांधापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न, कोरडवाहू शेतीत ज्वारीचे महत्त्व अधोरेखित करून आर्थिक स्थैर्य मिळवून दिल्याबद्दल प्रशंसा केली. यशामुळे केंद्राचे प्रमुख डॉ. अंबिका मोरे, माजी प्रमुख डॉ. लक्ष्मण जावळे, डॉ. के. आर. कांबळे, डॉ. जे. ई. जहागीरदार, आदींचे कौतुक केले.

शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडणार...
ज्वार संशोधन केंद्र व ‘आयसीआरआयएसएटी’ हैदराबादतर्फे प्रसारित ‘परभणी शक्ती’ हा भारतातील पहिला जैव समृद्ध वाण आहे. तसेच पारंपरिक दगडी या वाणांत आनुवंशिकदृष्ट्या सुधारणा करून ‘परभणी सुपर दगडी’ या वाणाचे प्रसारण करण्यात आले. हे दोन्ही वाण शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असून, उत्पादनात नक्कीच भर देणारे आहे, असे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी सांगितले.

Web Title : किसानों के लिए परभणी शक्ति ज्वार: कम लागत, उच्च उपज वाली किस्म स्वीकृत

Web Summary : परभणी के कृषि विश्वविद्यालय की 'परभणी शक्ति' ज्वार, एक कम लागत, उच्च उपज वाली किस्म, को राष्ट्रीय मान्यता मिली। अनुसंधान, प्रौद्योगिकी हस्तांतरण और सूखे के लचीलेपन के लिए सराहना की गई, यह किसानों की आय में वृद्धि का वादा करती है। 'परभणी सुपर दगड़ी' भी जारी।

Web Title : Parbhani Shakti Sorghum: Low-Cost, High-Yield Variety Approved for Farmers

Web Summary : Parbhani's agricultural university's 'Parbhani Shakti' sorghum, a low-cost, high-yield variety, gains national recognition. Praised for research, technology transfer, and drought resilience, it promises increased farmer income. 'Parbhani Super Dagdi' also released.