अत्याचार करून पिडीतेला केले ब्लॅकमेल; तक्रारीनंतर आरोपी तिसऱ्या दिवशी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 02:27 PM2021-10-15T14:27:06+5:302021-10-15T14:31:20+5:30

rape case in Parabhani : आरोपी गंगाखेडमधील प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्याचा मुलगा आहे.

after rape women was blackmailed; The accused was arrested three days after the rape complaint | अत्याचार करून पिडीतेला केले ब्लॅकमेल; तक्रारीनंतर आरोपी तिसऱ्या दिवशी अटकेत

अत्याचार करून पिडीतेला केले ब्लॅकमेल; तक्रारीनंतर आरोपी तिसऱ्या दिवशी अटकेत

Next
ठळक मुद्देशेजारी राहणाऱ्या विवाहितेवर अत्याचार

गंगाखेड ( परभणी ) : शेजारी राहणाऱ्या २१ वर्षीय विवाहितेवर अत्याचार करून त्याचे फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधाम आरोपीस पोलिसांनी आज पहाटे अटक केली. रोहित पंडित ( ३५ ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी शहरातील प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्याचा मुलगा असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्याच्या विरोधात बुधवारी ( दि. १३ ) पिडीतेने गंगाखेड पोलिसात अत्याचाराची तक्रार दिली होती.

पिडीतेच्या तक्रारीनुसार, शहरातील नगरेश्वर गल्लीत रोहित पंडित आणि पिडीता राहते. रोहितने दि. ८ जून आणि दि. २२ जुलै २०२१ रोजी स्वतःच्या घरात पिडीतेवर अत्याचार केला. यावेळी आरोपीने फोटो देखील काढले. त्यानंतर फोटो पतीला दाखविण्याचे धमकी देत ब्लॅकमेल केले. याप्रकरणी पिडीतेने बुधवारी ( दि. १३ ) गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर तब्बल तीन दिवसांनी पोलिसांनी आरोपीस आज पहाटे अटक केली. 

पाथरीत देशी बनावटीचे पिस्टल बाळगणारे दोघे ताब्यात
गणेश छत्रभुज खुडे आणि प्रताप बाजीराव इंगळे ( रा बोरगव्हान ता पाथरी ) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पथक १३ ऑक्टोबर रोजी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पाथरी येथे आले होते. दरम्यान, रात्री ८ वाजेच्या सुमारास या पथकाला आष्टी फाटा टी-पॉईंट जवळ दोघेजण देशी पिस्टल बाळगून असल्याची  गुप्त माहिती  मिळाली. या माहितीवरून पाथरी येथील पोलीस उपनिरीक्षक जी. एन. कराड आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने आष्टी फाटा टी पॉईंट येथे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतले. 

Web Title: after rape women was blackmailed; The accused was arrested three days after the rape complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app