परभणी जिल्ह्यात सहा जुगाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:31 IST2018-12-09T00:31:03+5:302018-12-09T00:31:38+5:30
जिल्हा पोलीस पथकाने ७ डिसेंबर रोजी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून सहा जुगाºयांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी दिवसभरात ठिकठिकाणी हे छापे टाकण्यात आले. त्यात धनराज एकनाथ टोंपे (रा.नरळद), दशरथ तावडे (रा.गंगाखेड), वैभव अंकुश उबाळे (रा.वालूर), महादेव संभाजी आंबटकर (वालूर), बाळू काशिनाथ गोरे (वाघी धानोरा), कलंदर सिकंदर अन्सारी (रा.पाथरी) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. एकूण ७ हजार ७५० रुपये रोख, मटका जुगाराचे साहित्य जप्त केले.

परभणी जिल्ह्यात सहा जुगाऱ्यांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा पोलीस पथकाने ७ डिसेंबर रोजी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून सहा जुगाºयांवर कारवाई केली आहे.
शुक्रवारी दिवसभरात ठिकठिकाणी हे छापे टाकण्यात आले. त्यात धनराज एकनाथ टोंपे (रा.नरळद), दशरथ तावडे (रा.गंगाखेड), वैभव अंकुश उबाळे (रा.वालूर), महादेव संभाजी आंबटकर (वालूर), बाळू काशिनाथ गोरे (वाघी धानोरा), कलंदर सिकंदर अन्सारी (रा.पाथरी) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. एकूण ७ हजार ७५० रुपये रोख, मटका जुगाराचे साहित्य जप्त केले.
तसेच अवैध दारु विक्री करणाºया ८ जणांविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली आहे. गंगाखेड, पिंपळदरी, परभणी ग्रामीण आणि मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या दारु विक्री करताना शेषराव पांडुरंग चव्हाण (गंगाखेड), पुंडलिक सखाराम पवळे (रा.आंबेटाकळी), नारायण ज्ञानोबा घुंबरे (रा.पोखणी फाटा), संतराम पांडुरंग पूर्णे, संदीपान अनिबा बनसोडे (रा.सुप्पा जहागीर), विष्णू रावन काठुळे, मारोती गंगाधर गायकवाड, शेख अस्लम शेख काल्या यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली असून आरोपींच्या ताब्यातून ८ हजार ८२० रुपयांची दारु जप्त करण्यात आली.