Accidental death of worker at Baliraja Sugar Factory in Purna | बळीराजा साखर कारखान्यात कामगाराचा अपघाती मृत्यू
बळीराजा साखर कारखान्यात कामगाराचा अपघाती मृत्यू

ठळक मुद्देआरबीसी साखळीत अडकून झाली दुर्घटना

पूर्णा : बळीराजा साखर कारखान्यात आरबीसी विभागात काम करणाऱ्या एका कंत्राटी कामगाराचा साखळीत अडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. ओम चांदोजी  रेनगडे असे मृत कामगाराचे नाव आहे.

पूर्णा पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, कानडखेड शिवारातील बळीराजा साखर कारखान्यात उस गाळप सुरु आहे. ओम रेनगडे हा या ठिकाणी बॉयलरसाठी लागणारा भुसा भरण्याचे काम करत असे. आज भुसा भरत असताना आरबीसी यंत्रणेत त्याचा पाय अडकून झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, जमादार सय्यद मोईन, समीर पठाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी सायंकाळी ५ वाजेपर्यंत गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी घटनास्थळी धाव घेत मृत तरुणाच्या नातेवाईकांचे त्यांनी सांत्वन केले.

Web Title: Accidental death of worker at Baliraja Sugar Factory in Purna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.