रस्ता क्रॉस करताना भरधाव वाहनाने तरुणास चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 12:53 IST2023-07-29T12:53:31+5:302023-07-29T12:53:58+5:30

मानवत तालुक्यातील रामेटाकळी रस्त्यावरील घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू

A young man was crushed by a speeding vehicle while crossing the road | रस्ता क्रॉस करताना भरधाव वाहनाने तरुणास चिरडले

रस्ता क्रॉस करताना भरधाव वाहनाने तरुणास चिरडले

- सत्यशील धबडगे 
मानवत:
तालुक्यातील रामेटाकळी रस्त्यावर असलेल्या हॉटेलमधून जेवण करुन बाहेर आल्यानंतर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 28 जुलै रोजी रात्री 11 वाजता घडली. सिद्धेश्वर चोखट असे मृताचे नाव आहे.

तालुक्यातील सारंगापूर येथील रघुनाथ उर्फ सिद्धेश्वर चोखट हे रामेटाकळी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री जेवायला गेले होते. रात्री 11 वाजता जेवण करुन बाहेर आल्यावर रस्ता ओलांडत असताना भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने सिद्धेश्वरला जोराची धडक दिली. या अपघातात सिद्धेश्वर चोखट वय (31) याचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन अपघातस्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोउनि गिरी, सपोउनि गुलाब घुगे, तुकाराम नरगिरे, नरेंद्र कांबळे, प्रकाश अकमार, शिवनंद जायभाये यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला.

Web Title: A young man was crushed by a speeding vehicle while crossing the road