पहाटे डुलकी लागली अन् ट्रक चालकाने जीव गमावला; अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 17:13 IST2023-03-10T17:12:39+5:302023-03-10T17:13:08+5:30
सिमेंटचा ट्रक आणि उसाच्या ट्रॅक्टरचा समोरासमोर झाला अपघात

पहाटे डुलकी लागली अन् ट्रक चालकाने जीव गमावला; अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी
मानवत: तालुक्यातील रामेटाकळी शिवारात हमदापूर पाटीवर ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा आणि सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात आज पहाटे 4 वाजता झाला. यात एका चालकाचा मृत्यू झाला. तर दुसरा चालक गंभीर जखमी झाला. ट्रक चालकास डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
पोखरनी कडून पाथरीकडे सिमेंट घेऊन एक ट्रक ( टी एस 01 यू सी 5556 )जात होता. हमदापूर पाटीजवळ पाथरीकडून पोखरणीकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरसोबत ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात ट्रक चालक बासी शिराजुद्दीन (रा हरियाणा) याचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालक बंडू उर्फ नवनाथ जाधव ( कोकर कॉलनी, मानवत) जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, स पो नी आनंद बनसोडे, प्रभाकर कापुरे, पोलीस नायक भरत नलावडे, मधुकर चट्टे, शेख जावेद, विष्णू चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, ट्रक चालकाला पहाटे झोपेची डूलकी लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.