४४ जणांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:39+5:302021-09-13T04:17:39+5:30
लायन्सचे माजी प्रांतपाल डॉ. के.सी. पारख यांच्या स्मृतिदिनानिमित्त लायन्स क्लब परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी नांदखेडा येथे मोफत ...

४४ जणांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड
लायन्सचे माजी प्रांतपाल डॉ. के.सी. पारख यांच्या स्मृतिदिनानिमित्त लायन्स क्लब परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी नांदखेडा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नांदेड येथील लायन्स नेत्र रुग्णालयाचे डॉ. शेंडगे व त्यांच्या पथकाने नागरिकांची तपासणी केली. एकूण ११० नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे, अशा ४४ जणांची निवड करण्यात आली असून या सर्वांवर सोमवारी नांदेड येथील लायन्स नेत्र रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. विशेष म्हणजे रुग्णांची निवास व भोजन व्यवस्था तसेच इतर तपासण्या रुग्णालयामार्फतच केल्या जाणार आहेत. या वेळी लायन्सचे अध्यक्ष प्रदीप गोलेच्छा, उपाध्यक्ष निरज पारख, सुनील मुथा, शैलेश मल्होत्रा, ॲड. झुंबारलाल मुथा, श्रीराम गर्जे, उदय लुकंड, सरपंच अशोक जोंधळे आदींची उपस्थिती होती.