शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक प्रकरणातील ४ आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:14 IST

सेलू : कमी भावात सोने देतो म्हणून मुंबई येथील एका डाॅक्टर महिलेला सेलू येथे बोलावून मारहाण करून ...

सेलू : कमी भावात सोने देतो म्हणून मुंबई येथील एका डाॅक्टर महिलेला सेलू येथे बोलावून मारहाण करून ८ लाख रुपये लुटणाऱ्या मुख्य आरोपी महिलेसह ४ जणांना स्थानिक गुन्हे शाखा आणि सेलू पोलीसाच्या संयुक्त पथकाने रविवारी पहाटे सेलू तालुक्यातील जवळा जिवाजी व सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथून ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून ५ लाख ५ हजार रुपये हस्तगत केले आहेत. या किचकट गुन्हयाचा ४८ तासांत तपास लावण्यात पोलिसांना यश आले.

मुंबई येथील डाॅ. उज्ज्वला संदीप बोराडे यांना ३० हजार रुपये तोळा याप्रमाणे देतो, असे आरोपी महिलेने सांगितले होते. त्यामुळे डाॅ. उज्ज्वला या पती, काका यांना घेऊन सोने खरेदी करण्यासाठी शुक्रवारी सेलू येथे आल्या होत्या. मात्र आरोपी सुनिता आणि तिच्या सात साथीदारांनी डॉ.उज्ज्वला तसेच सोबत असलेले पती आणि काका यांंना काठ्यांनी बेदम मारहाण करून ८ लाख रुपये रोख आणि मोबाईल फोन असे ८ लाख २१ हजार रूपये लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सेलू पोलिसात सुनीता सह अज्ञात ८ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाला होता.

स्थानिक गुन्हा शाखा आणि स्थानिक पोलिसांचे ४ पथके आरोपींच्या शोधात होते. पथक प्रमुख व्यंकटेश आलेवार आणि विजय रामोड यांनी माहिती घेतली तेव्हा स्थानिक आरोपींनी बाहेर जिल्ह्यातील आरोपींच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पण झाले. खात्रीशीर माहिती झाल्यानंतर गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक व्यंकटेश आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांच्या पथकाने सेलू तालुक्यातील जवळा जिवाजी येथे छापा टाकून मुख्य आरोपी सविता भोसले व मंजिरी सुखवास शिंदे या दोन्ही आरोपी महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ लाख ९० हजार रुपये हस्तगत केले. सेलू पथकाचे प्रमुख विजय रामोड, स्थागुशाखेचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांच्या पथकाने सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथून श्रीनाथ भोसले व शैलेश शिंदे यांना ताब्यात घेऊन १५ हजार रुपये हस्तगत केले. पथकाने ४ आरोपींना अटक करून रोख ५ लाख ५ हजार रुपये हस्तगत केले. पोलीस पथकात मधुकर चट्टे, शिवादास धुळगुंडे, दिलावर खान पठाण, सय्यद मोबीन, किशोर चव्हाण, हरिशचंद्र खुपसे, शेख अझहर, संतोष सानप, निळे, विलास सातपुते, रामेश्वर मुंडे, बाळू पुरणवाड, सायबर गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, गौस खान पठाण यांचा समावेश होता.