पाच ठिकाणी धाडी टाकून दारुच्या ११० बाटल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST2021-01-14T04:14:48+5:302021-01-14T04:14:48+5:30

परभणी : पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ५ ठिकाणी धाडी टाकून अवैधरित्या बाळगलेली ११० बाटल्या दारु जप्त ...

110 bottles of liquor seized in five raids | पाच ठिकाणी धाडी टाकून दारुच्या ११० बाटल्या जप्त

पाच ठिकाणी धाडी टाकून दारुच्या ११० बाटल्या जप्त

परभणी : पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ५ ठिकाणी धाडी टाकून अवैधरित्या बाळगलेली ११० बाटल्या दारु जप्त केली. पालम तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी १२ जानेवारी रोजी अवैधरित्या दारू विकली जाणाऱ्या पाच ठिकाणांवर धाडी टाकल्या. यामध्ये बनवस येथे कमलबाई लहू मंदे या महिलेकडून देशी दारुच्या १७, चाटोरी येथे शेख आलम शेख वजीर याच्याकडून १६, पालम शहरातील पेठ पिंपळगाव चौक भागात माधव शेषेराव शिंदे याच्याकडून ४८, पेठशिवणी ते पारवा रोड या भागात एका हॉटेलजवळ निवृत्ती मुंजाजी गायकवाड याच्याकडून १४, पिंपळगाव रोड भागात माधव एकनाथ पठाडे याच्याकडून १५ अशा अवैधरित्या बाळगलेल्या एकूण ११० देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 110 bottles of liquor seized in five raids