दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 16:02 IST2021-12-20T15:59:13+5:302021-12-20T16:02:26+5:30
आज पहाटे घरीच घेतला गळफास, कारण अस्पष्ट

दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
लिंबा (ता. पाथरी) : दहावी वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
गणेश उद्धव माने (१६, रा. सुरमगाव, ता.माजलगाव, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. लिंबा येथे त्याचे मामा सोमेश्वर शिवाजी कदम यांच्याकडे तो राहत होता. लिंबा येथीलच माधवाश्रम स्वामी हायस्कूलमध्ये तो दहावी इयत्तेत शिक्षण घेत होता. २० डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास त्याने घरीच गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बीट जमादार जी. एन. पिंपळपल्ले तपास करीत आहेत.