मानवत येथे दुचाकी अपघातात १ जण ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 11:50 IST2018-07-03T11:49:26+5:302018-07-03T11:50:11+5:30

शहराजवळील एका जिनिंग समोर सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली.

1 person killed in a bike accident at Manavat | मानवत येथे दुचाकी अपघातात १ जण ठार 

मानवत येथे दुचाकी अपघातात १ जण ठार 

मानवत (परभणी ) : शहराजवळील एका जिनिंग समोर सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एकजण ठार झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील रुढी येथील राजेभाऊ होंडे आणि खरबा येथील नामदेव निर्मळ हे दोघे दुचाकीवरुन मानवतकडून रुढीपाटीकडे जात होते. दुचाकी राष्ट्रीय महामार्गाजवळ आली असता त्याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात राजेभाऊ आणि नामदेव गंभीर जखमी झाले. 

यानंतर त्यांना उपचारासाठी मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना नामदेव यांचे निधन झाले. तर जखमी असलेले राजेभाऊ यांच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालय उपचार सुरु आहेत. बीट जमादार सांवत, पुंजाजी बहिरट यांनी घटनास्थळी जाउन  पंचनामा केला.

Web Title: 1 person killed in a bike accident at Manavat