जिथे कमी, तिथे आम्ही

By Admin | Updated: August 29, 2014 09:47 IST2014-08-29T09:47:25+5:302014-08-29T09:47:25+5:30

शहरातील नालेगाव, चौपाटी कारंजा भागातील श्री विक्रांत गणेश मंडळाचे नाव सर्वदूर पोहोचले आहे ते त्यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे ! केवळ दहा दिवसांचा उत्सव नव्हे, तर वर्षभर सामाजिक बांधिलकी जपत विक्रांत गणेश मंडळाचे कार्यकर्ते ‘जिथे कमी, तिथे आम्ही’ या तत्त्वाने काम करीत आहेत.

Where we are, there we are | जिथे कमी, तिथे आम्ही

जिथे कमी, तिथे आम्ही

श्री विक्रांत गणेश मंडळ
 
खास उपक्रम :
शहरातील नालेगाव, चौपाटी कारंजा भागातील श्री विक्रांत गणेश मंडळाचे नाव सर्वदूर पोहोचले आहे ते त्यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे ! केवळ दहा दिवसांचा उत्सव नव्हे, तर वर्षभर सामाजिक बांधिलकी जपत विक्रांत गणेश मंडळाचे कार्यकर्ते ‘जिथे कमी, तिथे आम्ही’ या तत्त्वाने काम करीत आहेत. 
पर्यावरण, स्वच्छता, स्त्रीभ्रूणहत्त्या, पाणी वाचवा आदि प्रबोधनात्मक देखाव्यांवर मंडळाने भर दिला आहे. गेल्या वर्षभरात नेत्रदान, देहदान आणि रक्तदानाविषयी जागृती करण्याची मोहीम मंडळाने हाती घेतली. वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकाने रक्तदान करावे, यासाठी रक्तदानाचा संदेश पाच हजार तरुणांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचविला. माहितीपत्रक, बॅनर, व्याख्यानं, पथनाट्यं, चित्रं यासारख्या विविध गोष्टींचा वापर करुन मंडळाचे कार्यकर्ते रक्तदान, नेत्रदानाविषयी जनजागृती करताना दिसतात. 
गणेशोत्सवानंतरच किल्लारी येथे झालेल्या भुकंपात उद्ध्वस्त झालेल्या धान्याची मदत करायला या मंडळाचे कार्यकर्ते पहिल्यांदा धावले होते.  तेव्हापासून मंडळाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यावरच भर देत आहेत. 
गेल्यावर्षी त्यांनी एक खास उपक्रम केला.  अनेकांच्या घरात डॉक्टरांनी दिलेली औषधे बरेचदा न घेता नुस्ती पडून राहतात. अशी घरोघर पडून राहिलेली औषधे गोळा करण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं.  जमलेल्या औषधांपैकी उपयुक्त असलेली, एक्सपायर न झालेली औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजूंना देण्यात आली. 
याशिवाय गेल्या वर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीत जेवढा कचरा रस्त्यावर साचला होता, तो उचलण्यासाठी महापालिकेच्या कामगारांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.  प्रसादाचे द्रोण, पत्रावळी वेचण्याचे काम मंडळाने केले. मंडळाचे अध्यक्ष योगेश पाठक, ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत कलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ वर्षभर उपक्रमशील असते.यंदा हे मंडळ ३५व्या वर्षांत पदार्पण करीत आहे आणि कार्यकर्ते आपल्या परीनं सामाजिक उपक्रम राबवण्याचाही प्रयत्न करत मंडळाचं काम पुढे नेत आहेत.
- सुदाम देशमुख
 

 

Web Title: Where we are, there we are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.