शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

वॉच युवर स्टाइल

By admin | Updated: July 18, 2014 11:40 IST

स्टायलिश राहणीमानाची स्पेशल सिक्रेट्स सांगणारा एक नवा कोरा कॉलम

तुम्ही शॉपिंगला जाताना मनात काय ठरवता? म्हणजे कसं प्लॅन करता की, आपल्याला काय घ्यायचंय? तुम्ही म्हणाल त्यात काय प्लॅन करायचंय? सरळ मॉलमध्ये जायचं, जे काय ट्रेण्डी दिसेल, स्मार्ट वाटेल ते उचलून आणायचं. ( बजेट पहावं लागतं, बाकी काही नाही.)
कपड्यांचं शॉपिंग बहुतेक जण असंच करतात.
आपल्या मित्रमैत्रिणीनं जे घेतलंय ते तरी घेतात किंवा आपण कुठे तरी पाहिलेलं, फॅशनमध्ये असलेलं, कुठल्या तरी मासिकात, टीव्ही शोमध्ये बघितलेलं असं काहीतरी दुकानातून, मॉलमधून घेऊन येतात.
फार्फार तर खरेदी करताना त्यांच्या डोक्यात एकच विचार असतो की, अमुक एक रंग आपल्याला चांगला दिसत नाही. एकतर ते मत त्यांन स्वत: तरी ठरवलेलं असतं किंवा त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणींनी तरी सांगितलेलं असतं. पण त्यापलीकडे  रंगांचा काही विचारच कुणी करत नाही. ना रंगांचा विचार केला जातो ना, फॅब्रिकचा, ना कट्सचा ना ते कपडे आपल्याला शोभतील की नाही याचा.
खरंतर मॉलमध्ये जाताना बजेटइतकंच महत्त्व किंवा त्याहूनही जास्त महत्त्व या सगळ्या गोष्टींना आहे. 
पण आपण ते सारं काही समजून घेतच नाही. मात्र फॅशन म्हणून नाही तरी बदलत्या काळाची, प्रेझेंटेबल असण्याची गरज म्हणून तरी आता सगळ्यांनीच या गोष्टी समजून घ्यायची गरज आहे. नव्या कॉर्पोरेट जगात काम करताना, नव्या लाइफस्टाइलमधे आपलं ‘दिसणं’ हीदेखील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. ठरते आहे. कसंही राहिलं गबाळं, तरी चालतं असं म्हणण्याचे दिवस आता संपले. उलट आपल्या कामाला, पर्सनॅलिटीला, आपण काम करतो त्या वातावरणाला आणि आपल्या लूकला काय शोभून दिसेल याचा अत्यंत गांभीर्यानं विचार करायला हवा. ती कला शिकून-समजून घ्यायला हवी. - कला? अर्थात कला. कपडे घालणं, त्यांची योग्य निवड करणं ही एक कलाच आहे.
ती शिकली, त्यामागचं सूत्र समजून घेतलं. तर आपणही आपला लूक बदलू शकतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम देऊ शकतो. आणि आपलं म्हणून एक खास इम्प्रेशनही जमवू शकतो.
स्टाइल स्टेटमेण्ट याहून वेगळं ते काय असतं.?
ते कसं करायचं हेच सांगणारा एक प्रवास या अंकापासून सुरू करतोय.
‘स्टायलिस्ट’ म्हणून मला असं नेहमी वाटतं की, प्रत्येकानंच आपल्याला ‘दिसण्याचा’ खास विचार करायला हवा. चांगलं दिसणं, टापटिप राहणं, आपल्या राहणीमानात सुधारणा करणं ही या काळाची गरज आहे.
ती आपण आपल्यापुरती तरी भागवू शकतो.
सो, लेट्स स्टार्ट. आपण बोलू. स्टाइल्सविषयी, कपड्यांविषयी आणि त्याकडे पाहण्याच्या एका खास दृष्टीविषयी.
- प्राची खाडे (स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर)