आॅक्सिजन (दि. २३ मार्च २०१७) या अंकात ‘जमिनीखालचे जीवन’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. कर्नाटकात राहणारे कन्नड भाषक गिरीश बद्रागोंड हे बोअरवेल आणि वॉटर मॅनेजमेंटच्या संदर्भात काम करतात. बोअरवेल कुठे खोदावी, कुठे पाणी लागेल यासंदर्भात ते मार्गदर्शन करीत नाहीत; मात्र बोअरवेल खोदल्यानंतर तिथे पाणीच न लागल्याचे प्रकार घडतात किंवा अनेकांची बोअरवेल काही दिवसांत, काही महिन्यांत ड्राय होते अशावेळी रेनवॉटर हार्वेस्टिंग पद्धतीने या कोरड्या बोअरवेल्सना पाणी कसे आणता येईल यासंदर्भात ते मार्गदर्शन करतात. त्यासाठी किमान दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र ही बोअरवेल कायमस्वरूपी बंद केलेली नसावी. ड्राय झालेली, पण तात्पुरती बंद केलेली बोअरवेलही व्यवस्थित कॅप लावून बंद केलेली असावी. उघड्या बोअरवेलमध्ये पडून अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत.
गिरीश हे कन्नड भाषक असून, मराठी किंवा हिंदी भाषेत ते संवाद साधू शकत नाहीत. शिवाय कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन कोणा एकट्यादुकट्याला मर्गादर्शन करणे अव्यवहार्य आणि खर्चिक ठरू शकते. तथापि, किमान काही ठरावीक शेतकऱ्यांचा गट एकत्र येऊन त्यांना मार्गदर्शन करता येऊ शकेल असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या कामाच्या संदर्भात येत्या काही दिवसांत एक छोटा व्हिडीओही ते तयार करणार आहेत. फोनवरुन माहिती देण्यासाठीची यंत्रणा किंवा मनुष्यबळ सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही, असे त्यांनी कळवले आहे. तथापि, इच्छुकांनी खाली दिलेल्या त्यांच्या फेसबुक पत्त्यावर अथवा त्यांच्या ईमेलवर संपर्क साधावा. बोअरवेल संदर्भातील खर्च आणि व्यवहार्यता यांची संपूर्ण खातरजमा केल्यानंतरच व्यवहार करावा. इमेल - ggbadragond@gmail.com
फेसबुक पेज - https://www.facebook.com/girish.badragond