शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

भिजक्या पावसातली छत्री

By admin | Updated: October 27, 2016 16:01 IST

काय कमवलं म्हणजे आपण खूप श्रीमंत होऊ? -पैसा!! तो तर लागतोच! पैशाची श्रीमंती कमी कोण लेखेल? लक्ष्मीची पूजा तर आवसेलाही करतो आपण आणि उजळवून टाकतो सारी आवस!! कष्टानं कमावलेला, चांगल्या कामातून, घामाच्या धारांतून फुललेला पैसा श्रीमंती आणतो, सुबत्ता आणतो.. जगण्याला स्थैर्य आणि सुरक्षितताही देतो मान-सन्मान-प्रतिष्ठा-अधिकार सारं काही देतो तो हा पैसा..

काय कमवलं म्हणजे आपण खूप श्रीमंत होऊ? -पैसा!! तो तर लागतोच! पैशाची श्रीमंती कमी कोण लेखेल? लक्ष्मीची पूजा तर आवसेलाही करतो आपण आणि उजळवून टाकतो सारी आवस!!कष्टानं कमावलेला, चांगल्या कामातून,  घामाच्या धारांतून फुललेला पैसा श्रीमंती आणतो, सुबत्ता आणतो.. जगण्याला स्थैर्य आणि सुरक्षितताही देतो मान-सन्मान-प्रतिष्ठा-अधिकार  सारं काही देतो तो हा पैसा..पण पैशापाशी येऊन कमाईची आणि श्रीमंतीची व्याख्या थांबली तरपुरेसं श्रीमंत होणं नाही जमत..त्यासाठी अजून काही पुंजी आपल्यापाशी हवीच..वयाचा आकडा काहीही म्हणो,लहान मुलासारखं खळखळून, भरपूरहसता यायला हवं..अंगाचं मुटकुळं करून बिनघोर, शांत, ढाराढूर झोपता यायला हवं..चार चांगल्या हुशार, विद्वान माणसांनाआपल्याविषयी आदर वाटावा,माया वाटावी असं वागता यायला हवं..आपल्यावर सडकून टीका करतील,आपला कान धरतील आणि फटकारून काढतील चुकलं तरअशी माणसं कमावता यायला हवीत..सच्चे मित्र आणि बोलघेवडे, दिखावू मित्र यातला फरक समजायला हवा..आणि सच्च्या, दिलदार मित्रांसाठी देता यायला हवाप्रसंगी जीवही काढून, मग बाकी वेळ-पैसा काय चीज आहे?जे जे सुंदर, श्रेष्ठ ते ते सारं जपता यावं आपल्याला,रसास्वाद घेता यावा आपल्याला..चित्रांचे रंग कळावेत,फुलांची भाषा उमगावीआणि सप्त सुरातून उलगडणारी मैफलैआपल्याही कानात उतरावी..पावसात भिजत असताना दुसऱ्याच्या डोक्यावर धरता यावी छत्रीआणि भिजक्या पावसात नाचता यावं स्वत:सह जगालाही विसरून..एकतरी झाडं रुजावं,मोठं व्हावं आपल्या हातूनआणि एका तरी लेकराच्या चेहऱ्यावर फुलावंआपल्यामुळे हसू..आपण आलो तेव्हा जग जसं होतं,त्यापेक्षा ते सुंदर बनवण्याची असावी मनात धमकआणि सगळ्यांना घेता येईल मोकळा श्वास म्हणूनकरता यावी मनापासून धडपड..जगण्याची ही श्रीमंतीपगाराच्या चेकसोबत बॅँकेत जमा होत नाही..ती कमवावीच लागते..आणि कमवली तरी टिकवावी लागते..ती टिको.. वाढो.. जगो..आणि साऱ्यांना श्रीमंत करतभरभरून उरो..