शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

आकाशातले टिंबतारे

By admin | Updated: June 1, 2017 11:24 IST

दिवसभर खूप चाललोय. कधीही झोप येईल इतका दमलोय. थकलोय. टॉर्च बंद आहे. शेकोटीपण विझून गेलीये. सर्वत्र काळोख आहे

- प्रसाद सांडभोर 
 
दिवसभर खूप चाललोय. कधीही झोप येईल इतका दमलोय. थकलोय. टॉर्च बंद आहे. शेकोटीपण विझून गेलीये. सर्वत्र काळोख आहे. मिट्ट रात्र. तंबूच्या दारातून दिसतोय तेवढा चंद्रच काय तो एक पांढरा दिवा आणि आजूबाजूला चांदण्यांची रांगोळी. सप्तर्षी दिसतायत मधोमध. ओळखायला सगळ्यात सोप्पे. चार चांदण्या जोडून बनणारा पतंग आणि खाली लटकणारा त्याचा तीन चांदण्याचा धागा! त्या शेजारून सरळ डावीकडे पाहिलं की ध्रुवतारा. 
इथे तंबूत झोपल्या झोपल्या तो दिसणं जरा कठीण आहे. उठून बाहेर जावं का? मग पलीकडचा व्याध पण पाहता येईल. थंडी आहे चांगलीच. पण वा! कसलं दिसतंय आकाश! 
‘सगळ्यात आधी कोणी बरं शोधून काढली नक्षत्रं? अगदीच रिकामटेकडे असणार ते लोक नक्कीच. नाहीतर कोण असं ताऱ्यांचे टिंबं जोडून चित्रं बनवत बसेल?’ 
- मी असं म्हणायचो तेव्हा मनूकाकू खळखळून हसायची. रात्रीची जेवणं झाली की आम्ही गच्चीवर जाऊन बसणार. दररोज. सगळ्यात आधी गणिताच्या सूत्रांची रिव्हिजन, मग पाढे आणि मग नक्षत्रांचा तास. तिचं ते जुनं, जीर्णशीर्ण झालेलं आकाशदर्शनाचं पुस्तक डोक्यावर धरून वेगवेगळी नक्षत्रं शोधायची. कधी दोघांनी मिळून, कधी आलटून पालटून, तर कधी सगळ्यात आधी सगळ्यात जास्त नक्षत्र कोण शोधणार अशी स्पर्धा करत. कधी कंटाळून, नक्षत्रांचा नाद सोडून नुसतीच चित्रं बनवायची चांदण्यात अदृश्य रेषा ओढत-जोडत. 
अशीच एक अदृश्य रेषा ओलांडून निघून गेली ती. एकटीच. हसत हसत. मी अजूनही रेषेअलीकडेच आहे. कशा ना कशाचे टिंबं जोडत माझा माझा खेळ खेळतोय. चित्रं बनवतोय, खोडतोय, पुन्हा बनवतोय... 
असा दूर डोंगरात एकटाच भटकायला आलोय. 
तंबू टाकून विसावलोय आणि असं चांदणं पाहत मनूकाकू आठवतोय.