शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

एका हायवेची थरारक गोष्ट

By admin | Updated: October 27, 2016 15:52 IST

आपल्याला ऐकायला आवडेल तेच ऐकण्याची कानाला लागलेली सवय मोडा.. जे खायला आवडेल तेच खाण्याची जिभेची सवय तोडा.. आणि डोक्यावरच्या सुरक्षित छपराचा हट्टही सोडा.. त्यानंतर जे आयुष्य भेटेल, ते जगून पहा..

दिवाळी म्हणजे रुटीनचा हात सोडणं.. आपण जी पुंजी, जे धन कष्टानं मिळवतो,  त्याची पूजा करत ते सारं साजरं करणं, सजवणं आणि आपल्या कर्तृत्वाचे क्षण पुन्हा जगणं. स्वत:लाच नव्यानं भेटणं..आपल्याला आणि आपल्याच माणसांना भेटण्याचा  असाच एक प्रवास उलगडत जातो  तो यंदाच्या ‘लोकमत दीपोत्सव’ या दिवाळी अंकात! दिवाळी अंक म्हणजे जे जे  त्यातलं शक्यतो काहीच न करता, काही वेगळी वाट धरता येईल का, याचा विचार करता करताच तर आम्हाला सापडला ठऌ 44 हा हायवे! नॉर्मली पत्रकारांनी प्रवास कसा करावा,  ’असाईन्मेंट’वर असताना काय काय आणि कसं कसं करावं, हवी ती माहिती कशी जमवावी, याचे काही ठोकताळे ठरलेले असतात. - आम्ही ठरवलं, की हे सगळंच मोडून पाहू! पत्रकार म्हटलं, म्हणजे लोकांना प्रश्न विचारणं आलं. हल्ली तर अंगावर धावूनच जातात लोक.
आम्ही म्हटलं, की आपण ‘ऐकू’.समजून घेऊ.एरवी मान्यवर लोकांनाच भेटण्याचा रिवाज आहे.आम्ही म्हटलं, की मान्यवरच का?आपण सामान्य माणसांना भेटू.रस्त्यावर जो भेटेल त्याला/तिला भेटू.ते सांगतील ते ऐकू.आपण ठरवलेले प्रश्न घेऊन लोकांना भेटायला जायचं नाही आपण.एक साधी गोष्ट करायची :देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं,तेही रस्त्यानं, थेट प्रवास करत.कन्याकुमारी ते काश्मीर.वाटेत जे मिळेल ते खायचं.जिथं रात्र होईल तिथं मुक्काम करायचा.सकाळी उठल्यावर जी माहिती मिळेल, जी माणसं भेटतील, त्यांना भेटून, त्याप्रमाणे पुढे जायचं.वाचायला, ऐकायला फार सोपं, रोमॅण्टिक वाटतं हे,पण प्रत्यक्षात आपल्या मनाला इतक्या अनिश्चिततेची सवय नसते.आपण सारेच नाकासमोर जगायला,प्लॅन केल्याप्रमाणे गोष्टी पूर्ण करायला इतके सरावलेले असतो की,पुढच्या मिनिटाला काय करायचं?आज दिवस उगवला आता या दिवसभरात काय करायचं, हे माहितीच नाही.- ही अनिश्चितता आपल्या अंगावरच येते..जे घडेल ते घडू देणं, जे दिसेल ते पाहणं,जे आहे ते स्वीकारणं हे सारं खरं तर किती नैसर्गिक असतं..रोज उगवणाऱ्या आणि मावळणाऱ्या दिवसासारखं..पण असं नॅचरल जगणं विसरत, प्लॅण्ड आणि कण्ट्रोल जगण्यानं आपण आपले दिवस रुटीनच्या नावानंं भरून टाकतो.आमची रुटीनची डायरी फाडून टाकली ती या एका प्रवासानं.काही ठरवूच नका..चालत रहा, धावत रहा..लोक भेटत राहतील, ते सांगतील ते ऐकत रहा..आपल्याला काय ऐकायला आवडेल तेच ऐकायची कानाला लागलेली सवय मोडा.काय खायला आवडेल तेच खाण्याचीजिभेला लागलेली सवय तोडा.आणि कुठं रहायला आवडेल याचीसुरक्षित जाणीवही सोडा.आणि मग त्यानंतर जे तुमचं आणि इतरांचं आयुष्य तुम्हाला भेटेल,ते जगून पहा..- असं या प्रवासानंच सांगितलं!आणि आम्ही रस्त्यावर स्वार झालो.अनपेक्षितता आणि आश्चर्य मग इतकं सतत भेटायला लागलंकी सुरक्षित चाकोरीपेक्षा या अनपेक्षिततेचीच चटक लागली.रोज नवनवीन माणसं भेटत राहिली.ती आपापल्या कहाणीची हिरो-हिरॉईन्सच होती.कष्टानं झगडणारे, लढणारे,जिद्दीने आपली वाट तयार करणारे लोक.काही स्वत:पुरते हरलेले,पण आपल्या मुलाबाळांसह, भावाबहिणींच्या आयुष्यात उमेद पेरणारे.अनेकांकडे सांगण्यासारखं खूप होतं.इतक्या कहाण्या की शेकडो पुस्तकं वाचण्याचा अनुभव यावा.हे सारं घेऊन आम्ही परत आलोतेव्हा जाताना होतो, तसे उरलो नव्हतो.या दिवाळीत हा अनुभव, ही कमाईतुमच्या साऱ्यांसोबत वाटून घेतानाम्हणूनच श्रीमंत झाल्यासारखं वाटतं आहे.चला, या प्रवासाला.या वर्षीच्या ‘लोकमत दीपोत्सव’मध्ये....- टीम दीपोत्सव 
अधिक माहिती : 

sales.deepotsav@lokmat.com

 
स्वत:साठी घ्या, स्नेहीजनांना 'दिवाळी भेट' पाठवा !भारतभरात कुठेही घरपोच अंक मिळवण्यासाठी आॅनलाइन खरेदीची व्यवस्था : 
 
deepotsav.lokmat.com