शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

‘टच’मधे असलेलं एकटेपण

By admin | Updated: December 5, 2014 12:04 IST

डीअर फ्रेण्ड्स. अस्वस्थच वाटतं ना, कधीकधी एखादा लेख, एखादी बातमी वाचून. पुढच्याच पानावरच्या महादेवचीच गोष्ट घ्या. एरवी कशाला माहिती झाला असता तो आपल्याला? आणि वेळ कुठेय आपल्याला कुणाचा विचारबिचार करण्यासाठी? इथं स्वत:साठी वेळ नाही, स्वत:शी चार शब्द बोलायचे तरी फुरसत नाही. कित्येक दिवसांत तर घरच्यांशीही बोललेलो नाही. आजारी आजीला, म्हातार्‍या होत चाललेल्या मामाला भेटायला जाऊ जाऊ म्हणतो, पण वेळ कुठाय?

 

 
डीअर फ्रेण्ड्स. अस्वस्थच वाटतं ना, कधीकधी एखादा लेख, एखादी बातमी वाचून. 
पुढच्याच पानावरच्या महादेवचीच गोष्ट घ्या.
एरवी कशाला माहिती झाला असता तो आपल्याला? आणि वेळ कुठेय आपल्याला कुणाचा विचारबिचार करण्यासाठी?
इथं स्वत:साठी वेळ नाही, स्वत:शी चार शब्द बोलायचे तरी फुरसत नाही.
कित्येक दिवसांत तर घरच्यांशीही बोललेलो नाही. आजारी आजीला, म्हातार्‍या होत चाललेल्या मामाला भेटायला जाऊ जाऊ म्हणतो, पण वेळ कुठाय?
तसं ‘टच’मधे असतोच आपण एकमेकांच्या. सवयीनं बर्थ डे विश करतो. कुणी कुठं डोसा खाल्ला, कोण कुठं फिरायला गेलं, तिथं काय मजा केली हे सारं तर कळतंच आपल्याला.
करतात ना, ते सारं तेही फेसबुक किंवा व्हॉट्स अँपवर पोस्ट. फोटोबिटोसह..
आपणही करतो.
त्यांच्या घरी काय भाजी काल केली होती हेसुद्धा अनेकदा आपल्याला माहिती असतं.!
पण ही झाली सारी माहिती ! आपण टचमधे आहोत, एकमेकांच्या संपर्कात आहोत, हे सांगणारी किंवा तसा फील तरी देणारी ! पण आपण एकमेकांशी पोटातलं बोलणं, मनापासून सांगणं, कुणी सांगितलेलं ऐकून घेणं, हे सारं करतो का आता?
होतं असं काही?
बोलतो मनातलं काही भीडभाड न ठेवता एकमेकांशी? म्हणायला आपल्याला ढीगभर मित्र आणि मैत्रिणी.
पण प्रसंगी आपण एकटेच आणि मनातून पार एकेकटे.
गर्दीतलं हे सुनंपण, आपल्या सगळ्यांना खुपतं, सलतं, छळतं.
हे कधीतरी आपण मान्य करणार आहोत का? हातातला फोन बंद करून, प्रत्यक्ष आपल्या माणसांशी बोलणार आहोत का?
.कधीतरी !