साधेपणाचा सुंदर अनुभव
By Admin | Updated: August 29, 2014 09:49 IST2014-08-29T09:48:28+5:302014-08-29T09:49:27+5:30
यामंडळाची नाळच थेट लोकमान्य टिळकांच्या समाज जागृतीच्या उद्दिष्टाशी जोडलेली. स्वराज्य मिळवायचं या धेय्यानं भारलेल्या सेलूच्या त्याकाळच्या तरुण पिढीनं १८९९ मध्ये लोकमान्य टिळकांचा हस्तेच या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली.

साधेपणाचा सुंदर अनुभव
>- बारभाई गणेश मंडळ, सेलू
खास उपक्रम :
यामंडळाची नाळच थेट लोकमान्य टिळकांच्या समाज जागृतीच्या उद्दिष्टाशी जोडलेली. स्वराज्य मिळवायचं या धेय्यानं भारलेल्या सेलूच्या त्याकाळच्या तरुण पिढीनं १८९९ मध्ये लोकमान्य टिळकांचा हस्तेच या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. त्यासाठी समाजातील बारा लोक एकत्र आले होते. यामुळे या मंडळाचे नाव ‘बारभाई गणेश मंडळ’ असे पडले. ११४ वर्षांची परंपरा लाभलेलं हे मंडळ आहे. यंदा ११५व्या वर्षी या मंडळात बाप्पाचं आगमन होतंय. सुरूवातीच्या काळात विविध कार्यक्रम करत थाटामाटात हा उत्सव साजरा होत असे. पण विशेष म्हणजे आजची नवी तरुण पिढी मात्र अतिशय साधेपणाने या उत्सवाचे आयोजन करते. परंपरेप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन फक्त पूर्वापार श्रद्धेने केले जाते.
बारभाई नाव असले तरी या मंडळाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध आहे. उत्सवासाठी दरवर्षी उत्सव मंडळाची स्थापना होऊन कार्यकारिणी निवडण्यात येते. मारवाडी मोहल्ल्यात या गणपतीची स्थापना केली जाते. सर्व जाती-धर्मांची मंडळी उत्सवात सहभागी होतात. खरं सांगायचं तर साधेपणा आणि अत्यंत शिस्त, समाज जागृतीची कळकळ हेच या मंडळाचे खरे वैशिष्ट्य. आजूबाजूच्या कलकलाटात त्यांचा तामझाम उठून दिसतो.
- राजेश भोजेकर