शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

स्वयम आणि सत्यभामा

By admin | Updated: June 30, 2016 16:45 IST

इंजिनिअरिंग करणारी तरुण मुलं? नुस्ती प्रोजेक्टच्या मागे न लागता आणि घोकंपट्टी न करता एका ध्येयानं झपाटतात आणि उपग्रह बनवत थेट अंतराळ भरारी घेतात. हे सारं कसं घडतं? त्याची ही गोष्ट...

थ्री इडियट आठवतोय? त्यातला रॅँचो?पुस्तकी घोकंपट्टीपेक्षा प्रत्यक्ष करून पाहण्यावर विश्वास ठेवणारा आणि एक्सलन्सचा पिछा करा, कामयाबी झक मारके पिछे आएगी असं सांगणारा?- असेच काही रॅँचो सध्या पुण्यात भेटतील आणि काही चेन्नईत.इंजिनिअरिंगच करतात तेही.पण नुस्ते घोकत नाहीत, तर इंजिनिअरिंगच्या पलीकडे जाऊन त्यांनी उपग्रह बनवले आणि इस्त्रोनं त्यांचा दर्जा तपासत ते अवकाशातही सोडले.स्वयम आणि सत्यभामा.पुण्याच्या सीओईपी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला स्वयम आणि सत्यभामा युनिव्हर्सिटी, चेन्नई इथल्या विद्यार्थ्यांनी बनवलेला सत्यभामा सॅट हे ते दोन उपग्रह. ते अवकाशात झेपावल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या; पण त्यामागच्या जिद्दीच्या कहाण्या मात्र त्या अंतराळ भरारी इतक्याच थरारक आहेत.त्या फ्लॅशबॅकची एक झलक या अंकात तर आहेच;पण सत्यभामा सॅटच्या टीममध्ये काम करणारा दुर्ग प्रसाद म्हणतो तसं हे एक मानवी कष्टाचं आणि मानवी मर्यादांच्या पलीकडे जाऊन पूर्ण होणारं स्वप्न आहे. अंतराळात खऱ्या अर्थानं आपलं काम पोहचतं, त्याचा आनंद लाख मोलाचा आहे.सत्यभामा सॅट ग्रीन हाऊसचा डाटा उपलब्ध करून देणार आहे, तर स्वयम रेडिओसाठी पॉइण्ट टू पॉइण्ट सिग्नल मेसेजिंग करणार आहे.ज्या मुलांच्या कष्टानं हे स्वप्न साकार झालं ते तरुण मुलांनी केलेलं काहीतरी प्रायोगिक काम असं नाहीये, तर ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम आहे. आणि त्या नजरेनंच या मेहनतीकडे आणि दर्जाकडेही पाहायला हवं!स्वयम आणि सत्यभामा यांची ही भरारी अनेक तरुणांच्या मनात कष्टाची, प्रयोगाची आणि कल्पकतेची बीजं पेरत राहील ही आशा आहेच.- आॅक्सिजन टीम