शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

धुंद पाऊस, कणीस आणि...

By admin | Updated: June 30, 2016 12:34 IST

पावसाळ्याला नुकतीच कुठे सुरवात झाली आहे. या पावसाळ्या च्या कुंद वातावरणात, मनाला आल्हाद देणाऱ्या गारव्यात काहीतरी गरम हे हवचं. चहा हा बेस्ट आॅप्शन असला तरी खरी गंमत आहे ती गरमागरम कणीस खाण्यात..

-भक्ती सोमण

पावसाळ्याला नुकतीच कुठे सुरवात झाली आहे. या पावसाळ्या च्या कुंद वातावरणात, मनाला आल्हाद देणाऱ्या गारव्यात काहीतरी गरम हे हवचं. चहा हा बेस्ट आॅप्शन असला तरी खरी गंमत आहे ती गरमागरम कणीस खाण्यात...मनाशी चित्र रंगवून बघा. पाऊस खूप कोसळतोय, याक्षणी आवडत्या व्यक्तीबरोबर नाहीतर मित्र-मैत्रिणींबरोबर बाईक काढून लॉंग ड्राईव्हला जायचं. माळशेज, लोणावळा,खंडाळा अशा कितीतरी ठिकाणी तर पाऊसाबरोबरच धुकेही पसरलेले असते. त्यामुळे तो गारवा मनाला आल्हाददायक करतो. तृप्त करतोच करतो. यात खरी मजा येते ती कणीस खायला. पावसाचा आनंद लुटत असताना तिथल्या ठेल्यांवर कणीसवाले बसलेले असतात. शेगडीवर कणीस भाजताना ती गरम वाफ हवीहवीशी वाटते. मग ते भाजलेले कणीस, त्यावर मीठ, लिंबू, तिखट पेरून जी मजा आणते, त्याला खरच तोड नाही. पावसाळा एन्जॉय करताना मजा करावी तर अशीच असेच होऊन जाते. पावसाळ्यात कणसाचे दाणेही खूप येतात. मग या दाण्यांचे सूप, कॉर्न कबाब, भजी असे कितीतरी पर्याय अनेकांच्या घरात रंगतात. हा पाऊस सारखासारखा पडत रहावा असेच वाटते. काही वेळा असंही होतं की, काही दिवस पाऊसच पडत नाही. आपण छत्रीविना बाहेर पडतो. आपलं काम संपत नाही तो पुन्हा आभाळ भरून तो धुवाधार बरसू लागतो. अशावेळी चौपाटीवर जाऊन त्याचा आनंद घ्यावासा वाटतो. लाटांच्या सानिध्यात धम्माल करावीशी वाटते आणि हो कणीस पण खावसं वाटतं. कारण तेच तर पावसाबरोबर तन आणि मन प्रसन्न करत असतं. दुपारच्या वेळी घरी असताना पाऊस असेल तर घरातही किती मजा आहे हे कळतं. वातावरण कुंद होतं. आपण आळसावतो. मग छान झोप घेऊन चहा प्यावासा वाटतो. तेवढ्यात खालून कणीसवाला ओरडतो. आपल्यालाही छत्री घेऊन ते खाली जाऊन खाण्याचा मोह आवरत नाही. पण यावेळी सोबतीला असते ती घरातली मंडळी. त्यांच्याबरोबर कणीस खात , मस्त गप्पा मारता मारता, पुन्हा चहा पिता पिता तो दिवसही मस्त रंगतो. पण आठवत राहतं कणीसच.त्यामुळे पावसा तू बरस, त्या गारव्यात धुंद होताना कणीस खाण्याची मजा घ्यायची आहे सर्वांनाच. नाही का!