शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

ज्युनिअर डॉक्टर म्हणजे गुलाम? - हे कुणी ठरवलं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 16:09 IST

सीनिअरसमोर मान झुकवून गुलाम म्हणजे झेंडू पोझिशनमध्ये चालणं. सीनिअर म्हणेल ती पूर्व दिशा असं वागणं म्हणजे रॅगिंग. ते होतं; पण बोलत कुणीच नाही.

ठळक मुद्देकॉलेजची प्रतिष्ठा खराब होईल या हेतूने या प्रकरणांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जात असेल काय हा प्रश्नच आहे.

- डॉ. रोहित गणोरकरमानसिक आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, सर्च गडचिरोली.

मेडिकल कॉलेजमध्ये कायद्याने बंदी असली तरी आजही अस्तित्वात असणारी व्यवस्था म्हणजे रॅगिंग. एक-दोन वर्षानी सीनिअर असणारी टोळी रॅगिंग घेणं हा स्वतर्‍चा हक्क समजतात. पहिल्या वर्षाचे विद्यार्थी रॅगिंगपुढे आपण हतबल आहोत, त्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही असं समजतात.रॅगिंग म्हणजे थ्री इडियट सिनेमात दाखवल्याप्रमाणे फक्त डान्स नव्हे तर रात्नी 3 वाजेर्पयत एका रांगेत उभं राहणं, पन्नास मुलांची संपूर्ण नावं रोल नंबरसह पाठ न झाल्यास गालावर झापडा खाणं, पहिल्या वर्षाच्या मुलांना साध्या शर्ट-पॅन्ट घालण्याची सक्ती करणं, जिम व लायब्ररीमध्ये जाण्यावर र्निबध घालणं. सीनिअर समोर मान झुकवून गुलाम म्हणजे झेंडू पोझिशनमध्ये चालणं. थोडक्यात सीनिअर म्हणेल ती पूर्व दिशा असं रॅगिंगचं स्वरूप असतं. मेडिकलच्या शिक्षक वर्गावरसुद्धा अशी रॅगिंग झालेली असते व काहींनी घेतलेली असते. त्यामुळे रॅगिंग जुनाट रूढी परंपरेचीच गोष्ट आहे. कॉलेजची प्रतिष्ठा खराब होईल या हेतूने या प्रकरणांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जात असेल काय हा प्रश्नच आहे.या रॅगिंगमुळे व्यक्तीमध्ये एका प्रकारची लाचारी वाढते. स्वतंत्न विचार करण्याची शक्ती कमी होते. या सगळ्याचं प्रतिबिंब पदव्युत्तर शिक्षणात दिसून येतं. मग आम्ही रॅगिंग घेतली तर काय वावगं केलं असं म्हणणारा गट तयार होतो.मुंबईमधील आत्महत्येनंतर रॅगिंग, जातीयता यावर निषेध व्यक्त केला जात आहे. अशी घटना पुन्हा कधीच घडू नये असं वाटत असेल तर काही प्रश्न या व्यवस्थेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाग असणार्‍यांनी स्वतर्‍ला विचारायला हवेत.

अ) प्रथम वर्ष निवासी डॉक्टरांची संख्या तुलनेनं वाढत आहे तरीही त्यांना 6 तास झोप, 2 वेळच्या जेवणासाठी 1 तास, अंघोळीसाठी 1 तास, त्याच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी व्यवस्थित वातावरण हे किमान हक्क मिळवून देता येतील काय?आ) ज्युनिअर आणि सीनिअर हे शोषण व्यवस्थेप्रमाणे ‘प्रथम वर्षामध्ये आहात ना आम्हीपण भोगलं तुम्हीपण भोगा’. या दृष्टिकोनामध्ये बदल कराल काय?इ) एमबीबीएसमध्ये पहिल्या वर्षापासून सुरू असलेलं रॅगिंग, नाव पाठ न केल्यास मारणं या विकृत मानसिकतेमधून निर्माण झालेली शोषणाची व्यवस्था मुळापासून उपटून काढायला तयार आहोत काय?ई) दुसर्‍याचा छळ केल्यानं, हीन दर्जाची वागणूक दिल्यानं तोसुद्धा पुढील वर्षात अशीच गुलामगिरीची वागणूक त्याच्या ज्युनिअरला देतो, त्याचा मानसिक ताण वाढतो. त्याचा विकास खुंटतो. त्याच्या मनात न्यूनगंड तयार होतो हे मान्य करायला आपण तयार आहोत का?

****कायदा आहे तरीही..रॅगिंग विरुद्ध कायद्यानं लढणं तर गरजेचं आहे पण दुसर्‍या  व्यक्तीला त्नास होणार नाही ही भावना जोपासणं सुद्धा तितकेच गरजेचे आहे.  कारण एका आत्महत्येच्या मागे प्रचंड नैराश्य, हतबलता त्यापूर्वी अनेकांकडून छळ झाल्याचा अपमान झाल्याचे विचार असतात.  हे विचार थांबवता येत नाही इतकी त्याची तीव्रता  असते.  मा. सर्वोच्च न्यायालय आदेश मे 2009  नुसार विद्यार्थी व शिक्षकांनी रॅगिंग प्रतिबंधात्मक कार्यवाही पूर्ण केली तर कदाचित अशा घटना घडणार नाहीत.