शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पॅण्ट साडी! साडीचा कुठला प्रकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 15:06 IST

साडीचा हा कुठला नवीन प्रकार? याला म्हणतात, फ्युजन. ते ही बिंधास्त!

ठळक मुद्देनक्की ट्राय करून पाहा! ही आगळी-वेगळी सुटसुटीत पॅण्ट साडी!

- श्रुती साठे 

साडी नेसावी असं तर वाटते, पण साडी सांभाळणं मुश्कील, असं अनेकींना वाटतं. तुम्हाला साडी नेसता येत नाही, साडीत नीट वावरता येत नाही यावरून घरचे चिडवतही असतील. तर साडी आवडणार्‍या पण नेसता न येणार्‍या, ती सावरणं न जमणार्‍या अनेकींसाठी एक खुशखबर आहे. गुड न्यूज.  इकडून परकर दिसतोय मग साडी खाली ओढा असं काहीही करण्याची गरज नाही. टिपिकल घट्ट ब्लाउजला फाटा देऊन मस्त आवडत्या क्र ॉप टॉप सोबतही ही साडी नसलेला साडी मिरवता येईल!त्याला म्हणायचं पॅण्ट साडी.बरोबर वाचलं नाव. सध्या आपल्याकडे अनेक सेलिब्रिटींनी या साडीला अक्षरशर्‍ डोक्यावर घेतलेलं आहे. पारंपरिक साडी आणि वेस्टर्न कपडे याचं एक सुंदर फ्युजन म्हणजे ही पॅण्ड साडी. निर्‍या, पदर यामुळे तर आपल्या साडीचं सौंदर्य उठून दिसतं. त्याचं भान ठेऊन डिझायनर्सनी पॅण्ट साडीमध्ये निर्‍या, पदर यांचाही उत्तम वापर केला आहे.  लाउंज पॅण्ट आणि क्र ॉप टॉप किंवा मॉडर्न ब्लाउज यांनाही यात स्थान आहे. अमृता खानविलकर नुकतीच अशाच एका सुंदर पॅण्ट साडीमध्ये दिसली. डिझायनर सोनम लुथरिया यांनी डिझाइन केलेली ही पॅण्ट साडी अमृतावर खुलून दिसली. थ्रेड आणि टॅसल्स ही थीम पकडून बनवलेली पॅण्ट साडी. त्यावरील धाग्यांची आणि गोंडय़ांची झालर खास.  सोहा अली खानसुद्धा अशाच एका पॅण्ट साडीमध्ये छान दिसली. ही हॅण्डलूम साडी त्याच्या वरील फुलांच्या साध्या एम्ब्रॉयडरीमुळे सोज्वळ दिसते. या साडीवर सोहाने ब्लाउज म्हणून वापरलेला पांढरा लूज शर्ट आणि पलाझो पॅण्ट कम्फर्टेबल लूक देते.आवडले हे दोन्ही लूक? तर मग नक्की ट्राय करून पाहा! ही आगळी-वेगळी सुटसुटीत पॅण्ट साडी!