शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशन टेबलवर

By admin | Updated: April 28, 2016 13:52 IST

दुपारचे बारा वाजत आले होते. मी शांतपणे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होते. दाराजवळ कोणाची चाहुल लागली तर वाटायचं नर्स येईल आणि म्हणेल, चला आॅपरेशन थिएटरला.

 - शची मराठे

(कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शची ही एक मुक्त पत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)

मागे वळून पाहिलं तर एकजण माझं स्ट्रेचर ढकलत आॅपरेशन थिएटरच्या दिशेनं चालला होता. माझ्या हृदयाचे ठोके माझ्याच कानांना ऐकू यायला लागले. मोठ्ठी खोली होती. छताला भरपूर विविध आकाराचे लाइट्स होते. त्याक्षणी मी स्वत:ला लाख लाख वेळा बजावत होते की झोप कसली येतेय तुला, सर्जरी आहे आता तुझी..दुपारचे बारा वाजत आले होते. मी शांतपणे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होते. दाराजवळ कोणाची चाहुल लागली तर वाटायचं नर्स येईल आणि म्हणेल, चला आॅपरेशन थिएटरला. हळूहळू भूक लागत होती. पण पाणीही प्यायचं नव्हतं. भूक असह्य झाल्यावर बाबांना सांगितलं. त्यांनी नर्सला बोलावलं. ती म्हणाली काहीही खायचं नाही. चक्कर येतेय का, तर सलाइन लाऊ या. तिच्या या उत्तरावरच माझं पोट भरलं. मी नको सांगितलं. दुपारचे दोन वाजले. माझी झोप काढून झाली, पुस्तक वाचून झालं, तरीही कोणी येईना. बाबा आणि काका जाऊन जेवूनही आले. आता चहा घ्यायचा की लगेच नको यावर त्यांची चर्चा चालू होती.  तेवढ्यात धाडकन दार उघडलं...

 

एक वॉर्डबॉय- स्ट्रेचर- पुन्हा वॉर्डबॉय त्यानंतर एक नर्स आणि आया या क्र मानं सगळे भस्कन खोलीत आले. बाबा आणि काका उठून उभे राहिले. त्यांनी चहा मनातल्या मनातच पिऊन टाकला आणि मी मनात म्हटलं, चला वेळ आली तर! मग पुढच्या घटना फारच वेगानं घडल्या. मला स्ट्रेचरवर झोपायला सांगितलं. नको आपण चालतच जाऊ असं मी म्हणाले. त्यावर त्यांनी डोळे मोठे करून एकमेकांकडे पाहिलं, नको आम्हाला डॉक्टर ओरडतील असं सांगत त्यांच्यात एक चर्चेची क्वीक राउंड झाली. सर्वानुमते स्ट्रेचर नको तर व्हिल चेअरवरून नेऊ असं ठरलं. मी हो म्हणण्यासाठी मान हलवणार तोच बाबा विद्युतवेगानं पुढे आले. माझ्या हाताला धरून त्यांनी मला उठवलं. आणि मग काय, मला स्ट्रेचरवर बसणं भागच होतं. (कामं कमी आणि नाटकं जास्त, माजलात सगळे तुम्ही, फटकवलं पाहिजे सगळ्यांना, वेळ काढू नका, आटपा लवकर अशी मला आणि त्या सगळ्या गोतावळ्याला उद्देशून असंख्य वाक्यं त्यांच्या त्या विद्युतवेगात सामावलेली होती. अर्थात ती फक्त मलाच ऐकू आली.) मी स्ट्रेचरवरून निघाले. मी स्ट्रेचरवर बसले होते, मांडी घालून. आजूबाजूला त्यांचा स्टाफ आणि मागे जरा लांब बाबा, काका चालत होते. मला गणपतीबाप्पा असल्याचा फील येऊन आपण स्ट्रेचरवर बसून विसर्जनाला चाललोय असं वाटतं होतं. किंवा कांदेबटाट्याची हातगाडी असते त्यावर बसल्यासारखं वाटत होतं. खूपच कॉमेडी. म्हणून मग मी आडवी झोपले. एका भल्यामोठ्या लिफ्टमधून आम्ही खाली जात होतो. एका मजल्यावर दार उघडलं. तिथे आॅपरेशन थिएटर होतं. एक डॉक्टर लगबगीनं आले आणि माझा उजवा हात धरला. इंजेक्शन देण्यासाठी. मी किंचाळले. डॉक्टर थबकले. किमोच्या सलाइनमुळे हात आखडला होता. ते सॉरी म्हणाले. मग एक सुई खुपसून आयव्ही कॅन्युला बसवलं आणि ते निघून गेले. अशा पद्धतीनं वेदनेची सुरुवात झाली होती. आता पुढे त्याच ट्रॅकवर चालायचं होतं. मनात आई-बाबा, बहीण, मुकेश, इतर नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्या आठवणींची प्रचंड गर्दी झाली. त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण सिनेमासारखे डोळ्यासमोर यायला लागले. रडू यायला लागलं. मनाला कितीही समजवलं तरी काहीच शाश्वत वाटतं नव्हतं. ताण काही केल्या कमी होत नव्हता. बोलायला कोणीही आजूबाजूलाही नव्हतं. आता भूक जाणवत नव्हती.

 

थोड्यावेळानं आजूबाजूला पाहिलं तर माझ्यापुढे आणखी तीन पेशंट्स वेटिंगमध्ये होते. त्यांच्या त्यांच्या स्ट्रेचरवर बसून. पार्किंगच्या प्रतीक्षेत माझी गाडी तिसरी होती. माझ्यापुढे एक बाई होती. ती स्ट्रेचरवर आडवी होती. जवळपास अर्धा तास आम्ही त्या वेटिंग लॉटमध्ये होतो. तेवढ्या वेळात एकदाही ती उठून बसली नाही की तिनं कूस बदलली नाही. तिच्या मनगटाला खूप धागे बांधले होते. त्या प्रत्येक धाग्यांपैकी एकतरी तिचं रक्षण करील असा तिला विश्वास होता बहुधा. मला वाटलं आॅपरेशन थिएटरमध्ये नेण्याआधीच अ‍ॅनॅस्थेशिया दिलाय की काय तिला, मी लगेच दुसऱ्या पेशंटकडे पाहिलं. पन्नास एक वर्षांचे चाचा होते ते. ते तर बसलेच होते माझ्यासारखे. सतत वर बघत होते. बहुतेक अल्लाला याद करत असावेत. 

 

मी नुस्तीच बसून होते. तिथे किती आॅपरेशन थिएटर्स असावीत याचा मी विचार करायला घेतला. सतत पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे कपडे घातलेले सर्जन इथून तिथे ये जा करत होते. सगळेच रिलॅक्स दिसत होते. फोनवर बोलत होते. एका सर्जनच्या एका पायात निळी तर दुसऱ्या पायात भलत्याच रंगाची स्लिपर होती. हा फारच घाईत असावा इथे येताना. (माझा अंदाज.) मी वाट्टेल तो विचार करत होते. मग स्वत:शीच अंताक्षरी खेळून झाली. तरी वेळ होताच. इतक्यात स्ट्रेचरवरची बाई हलली. मी लगेच तिचं निरीक्षण करायला घेतलं. तिनं एकाजवळ पाणी मागितलं. अर्थातचं तिला पाणी दिलं गेलं नाही. कारण आॅपरेशनला एम्टी स्टमक हवं. वाट बघून बघून माझी भीती कमी झाली होती. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते. आणि मग ती घटना घडते. पण माझ्याबाबतीत मी गेले चोवीस तासांपासून घाबरतच होते. पण ज्याची भीती वाटत होती ती घटना काही घडत नव्हती. त्यामुळे माझ्या भीतीमधलं थ्रिलच गायब झालं होतं.

 

अचानक माझ्या लक्षात आलं की माझं स्ट्रेचर पुढे सरकतय. की मला चक्कर येतेय. मी मागे वळून पाहिलं तर एकजण माझं स्ट्रेचर ढकलत आॅपरेशन थिएटरच्या दिशेनं चालला होता. माझ्या हृदयाचे ठोके माझ्या कानांना ऐकू यायला लागले. मोठ्ठी खोली होती. छताला भरपूर विविध आकाराचे लाइट्स होते. मी स्ट्रेचरवरून उठून आॅपरेशन टेबलवर झोपले. ‘सॉरी, तुम्हाला वाट पाहावी लागली..’ - डॉ. बडवे म्हणाले. मी हसले आणि ‘इट्स ओके’ म्हटलं. एक मोठी रिंग माझ्या नाकाभोवती बसवली आणि श्वास घ्यायला सांगितलं. माझी शुद्ध हरपली. तरी त्याक्षणी मी स्वत:ला लाख लाख वेळा बजावत होते की झोप कसली येतेय तुला, सर्जरी आहे आता तुझी..पण भूल पुरेशी चढली होतीच तेव्हा..