शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मित्रा, तुझं मडकं फुटकं आहे, म्हणूनच जीवन सुंदर झालंय.

By admin | Updated: April 11, 2017 18:29 IST

खांद्यावर कावड घेऊन पाणी आणणं हे त्याचं रोजचंच काम होतं. खांद्यावरच्या बांबूला दोन्ही टोकांना सारख्याच आकाराची दोन मडकी त्यानं दोरानं घट्ट बांधलेली होती.

खांद्यावर कावड घेऊन पाणी आणणं हे त्याचं रोजचंच काम होतं. खांद्यावरच्या बांबूला दोन्ही टोकांना सारख्याच आकाराची दोन मडकी त्यानं दोरानं घट्ट बांधलेली होती. पण त्यातलं एक मडकं व्यवस्थित, चांगलं होतं, तर दुसऱ्या मडक्याला तडा गेलेला होता. विहिरीवरुन पाणी आणताना दोन्ही मडकी तो पाण्यानं गच्च भरायचा, पण घरी परत येईपर्यंत त्यातलं एक मडकं अर्ध गळून गेलेलं असायचं आणि एका खेपेत जेमतेम दीड मडकं पाणी त्याला मिळायचं. आपण शिगोशिग पाणी आणतो याचा अर्थातच चांगल्या मडक्याला खूपच अभिमान होता, तर तडा गेलेलं मडकं आपल्या कमीपणाबाबत सारखं कुढत असायचं. आपल्यामुळेच मालकाला कमी पाणी घरी न्यावं लागतं याची बोच सारखी त्याच्या मनाला लागून असायची. एक दिवस आपल्या मनातली खळबळ तो मालकाला बोलून दाखवतोच. ‘मला माफ करा. माझ्यामुळे तुमची गैरसोय होते याचं मलाही खूप दु:ख आहे. माझ्यात जर वैगुण्य नसतं तर कदाचित मीही माझ्या दुसऱ्या मित्रासारखंच शिगेशिग जीवन माझ्यात भरुन आणू शकलो असतो..’ मालकानं त्याला अर्ध्यातच थांबवलं. म्हणाला, मित्रा, अरे तुझ्यातल्या वैगुण्याबद्दल दु:ख का बाळगतोस? उलट तू तसा आहेस म्हणूनच अधिक उपयोगी आहेस आणि मला तुझा खूप अभिमान वाटतो. जरा बघ आजूबाजूला, माझ्या कावडीच्या ज्या बाजूला तू आहेस, रस्त्याच्या केवळ त्याच बाजूला सुंदर सुंदर फुलं फुललेली आहेत. रस्त्याची दुसरी बाजू मात्र वैराण, रखरखीत आहे. तुला तडा आहे, हे तुझं वैगुण्य नाही तर ते तुझं बलस्थान आहे. तेच मी ओळखलं आणि रस्त्याच्या केवळ या बाजूला फुलं लावली. त्यामुळे नुसता रस्स्ताच सुंदर झाला नाही, तर त्या फुलांनी माझं घरही सजलंय आणि तेही सुंदर झालंय. उलट तुझ्याशिवाय मीच अपूर्ण आहे. तात्पर्य काय, तर आपल्या सगळ्यांत काही ना काही वैगुण्य असतं आणि तेच आपलं वैशिष्टयही असतं. पूर्णता आणि वैगुण्य यांच्या मिश्रणातूनच जीवन सर्वांगसुंदर होत असतं. मडकं फुटकं असणाऱ्या माझ्या साऱ्याच मित्रांना शुभेच्छा! - आॅक्सिजन टीम