शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

तरुण शेतकर्‍याला भेटा ना कधीतरी!

By admin | Updated: December 5, 2014 11:59 IST

तरुण शेतकर्‍याला भेटा ना कधीतरी!

 

 
मी एक तरुण शेतकरी आहे. आता शेतकरी आहे असं वाचून कुणालाही वाटेल की, असेल कुणीतरी रिकामटेकडा, अशिक्षित तरुण. नोकरी मिळाली नाही म्हणून बसला असेल घरी! तर हे साफ खोटं. मला काही जमत नाही म्हणून मी शेती करतोय असं नाही, तर आपण शेतकरी व्हायचं, हेच आपलं करिअर असं ठरवून मी शेतकरी झालो. मी एम. ए. इंग्रजी आहे. ( म्हणजे मला इंग्रजी लिहिता-बोलता-वाचता येतं.) 
अनेकांनी मला सांगितलं की, शेती सोडून दे, शहरात काहीतरी काम बघ. काही नाही तर जवळच्या एमआयडीसीत नोकरी कर. निदान दर महिन्याला पगार तरी मिळेल. शेती करणं आता परवडणारं नाही, शेतीत काहीच राम नाही. पण मी मात्र अशा लोकांना स्पष्टच सांगतो की, मला शेती परवडते आणि आवडतेही. कारण मी शेतीकडे पूर्णत: व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहतो. आणि म्हणूनच दरमहा पगार घेणार्‍यांपेक्षा मी चार पैसे जास्तच कमावतो.
काहीजण असंही म्हणतात की, शेतीत फार कष्ट करावे लागतात. पण आज कष्ट कुठं करावे लागत नाहीत. योग्य नियोजन, हवामानाचा अंदाज घेऊन पीक पेरणी केली, आधुनिक साधनांचा वापर आणि स्वत: पुढाकार घेऊन काम केलं तर कंपनीत काम करणार्‍या कामगारापेक्षा मी कितीतरी जास्त कमवू शकतो.
मी दिवसाला जास्तीत जास्त शेतात सहा तास काम करतो, तेवढंही निगुतीचं काम पुरे होतं. म्हणजे माझ्याकडे वेळही आहे, मानसिक समाधानही. आणि थोडाबहुत पैसाही. मग शेतकरी असण्याचा अभिमान वाटणार नाही तर काय? मुळात कमीपणा वाटण्याचं कारणच काय?
मी या माझ्या व्यवसायात उत्तम प्रगती करत राहीन, असा मला विश्‍वासही वाटतो. त्यामुळे शेतकर्‍याला काही भवितव्य नाही, तरुणांना शेतीविषयी काही प्रेम नाही असं म्हणणार्‍यांना आजचा माझ्या सारखा तरुण शेतकरी माहितीच नाही!
- बाळासाहेब सदाशिव खोत
रणदिवेवाडी, कागल