शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

थेट चीनसारख्या महासत्तेलाच आव्हान देणारा जोशुआ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 15:53 IST

हा तरुण हॉँगकॉँगचा. वय वर्षे फक्त 22. हॉँगकॉँगचा स्वायत्ततेसाठी जो लढा सुरू आहे, त्या लढय़ाचा चेहरा बनलाय हा बारकुडा, बुटकासा मुलगा. लहानपणी डिसलेक्सियाच्या आजारानं त्रस्त झालेल्या या तरुणानं आता भल्याभल्यांचं गणित चुकवायला सुरुवात केली आहे. कोण तो?

ठळक मुद्देहॉँगकॉँग लोकशाही हक्कासाठी भांडत आहे, आणि त्या लढय़ाचा चेहरा ठरला आहे जोशुआ वांग. वय वर्षे फक्त 22.

- निशांत महाजन

हॉँगकॉँगमध्ये सध्या स्वातयत्तेसाठी चीनविरोधी लढा सुरू आहे. आय अ‍ॅम फ्रॉम हॉँगकॉँग, नॉट चीन असे फलक लिहून जगभरात पसरलेले हॉँगकॉँगचे तरुण-तरुणी घेऊन फिरत आहेत. तसे शर्ट घालत आहेत.हॉँगकॉँगमध्ये तर हजारो तरुण मुलं-मुली रस्त्यावर उतरून आपल्या स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिकारांसाठी निदर्शनं करत आहेत. त्या प्रचंड मोठय़ा लढय़ाचा चेहरा बनलाय एक जेमतेम 22 वर्षाचा, बारकुडासा मुलगा. त्या मुलाच्या शांत चेहर्‍याकडे पाहून असं वाटतही नाही की एका महासत्तेच्या ताकदीला आव्हान देण्याचं बळ या लहानशा मुलात असेल?मात्र तसं आहे. आणि जगभर या मुलाच्या हिमतीचीही चर्चा आहे. ‘ द फेस ऑफ द प्रोटेस्ट’-ैआंदोलनाचा चेहरा म्हणून तो जगभर गाजतो आहे.त्याचं नाव जोशुआ वांग. हा फक्त 22 वर्षाचा तरुण आहे. एका साध्याशा मध्यमवर्गीय घरात तो वाढला. त्याचे वडील आयटीत नोकरी करायचे, तर आई वंचित मुलांना सेवासुविधा मिळाव्यात म्हणून काम करायची.2019 र्पयत जोशुआचंही आयुष्य एकदम चारचौघांसारखंच नाकासमोर चाललं होतं. शाळेतही तो जेमतेम हुशार होता. कारण त्याला डिसलेक्सिया या आजाराचा त्रास होता. मात्र 2010 साली त्यानं पहिल्यांदा लोकशाही आंदोलनात सहभाग घेतला. 2014 मध्ये हे आंदोलन अधिक तीव्र झालं आणि एक मोठी चळवळ उभी राहिली. तिचं नाव अम्ब्रेला मुव्हमेण्ट. या चळवळीत जवळपास दोन महिने पूर्ण शहर ठप्प झालं होतं. त्या चळवळीचं नेतृत्वच जोशुआनं केलं. तेव्हा तो जेमतेम 19 वर्षाचाही नव्हता. मात्र त्याच्या नेतृत्वगुणाची चर्चा झाली. आणि जगप्रसिद्ध टाइम मॅगझिनच्या टीन्स स्पेशल मुखपृष्टावर तो पर्सन ऑफ द इअर म्हणून झळकला.म्हणता म्हणता हॉँगकॉँगच्या लोकशाही आणि स्वायत्ततेसाठीच्या लढय़ाचा तो चेहरा बनत गेला. आंदोलन पेटतच होतं. ऑनलाइन जगातही त्याला पाठीराखे मिळत होते तर टीकाकारही. त्याच्यावर टीकाही जोरदार होते. सायबर बुलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र कशाचाही त्याच्या स्थिर चित्त प्रकृतीवर काहीही परिणाम होत नाही. एवढंच नव्हे तर 2017 साली त्याला अटक झाली. खटला दाखल होऊन शिक्षाही झाली. मात्र 2018 ला त्याची मुक्तताही करण्यात आली.जोशुआच्या जगण्याविषयी, संघर्षाविषयी एक डॉक्युमेण्टरीही 2017 मध्ये प्रसिद्ध झाली. तिचं नाव, अ टीनएजर व्हर्सेस सुपर पॉवर. एका कोवळ्या पोरानं थेट चीनसारख्या महासत्तेलाच आव्हान देणं हे किती थरारक आणि तरीही धोकेदायक असू शकतं याचा प्रवास हा माहितीपट सांगतो. पुढे नेटफ्लिक्सवरही ती रीलिज करण्यात आली.अजूनही जोशुआचा लढा सुरूच आहे. हॉँगकॉँग लोकशाही हक्कासाठी भांडत आहे, आणि त्या लढय़ाचा चेहरा ठरला आहे जोशुआ वांग. वय वर्षे फक्त 22.मात्र त्याची जिगर मोठी आहे.