शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

मिताली राज- सातत्य म्हणजे काय असतं?- तिला विचारा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 06:00 IST

मुलींचं क्रिकेट म्हणजे भातुकली असं म्हणणार्‍यांचे तमाम बाउन्सर डक करत ती परिस्थितीच्या पीचवर टिच्चून उभी राहिली, आणि विक्रमांच्या वाटेवर निघाली म्हणून ती ‘खास’ आहे!

ठळक मुद्दे* 200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू* वन डे क्रि केटमध्ये 6000 धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू* ट्वेंटी-20 क्रि केटमध्ये 2000 धावा करणारी पहिली भारतीय (महिलाच नाही तर पुरु ष क्रि केटपटूतही तीच अव्वल आहे.)

स्वदेश घाणेकर

मिताली राज. भारतीय महिला क्रि केट संघाचा कणा असलेली नव्हे कणा बनलेली ही खेळाडू. क्रि केट हा फक्त मुलांचा खेळ नाही, हे भारतीय मानसिकतेला ठणकावून सांगत तिनं आपली कारकीर्द घडवली. महिला क्रि केटपटूच्या हक्कांसाठी जागृत असणारी आणि गरज पडल्यास त्यासाठी बंडाचं शस्त्नही उपसणारी, रोखठोक भूमिका घेऊन लढणारी लीडर कॅप्टन. जिचा खेळ पाहून केवळ मुलीच नव्हे तर मुलांनाही (अनेक तरुणांना अजूनही  वाटतं की, बायकांचं क्रिकेट म्हणजे भातुकली म्हणून हा उल्लेख) महिला क्रि केटपटूंचा आणि क्रिकेटचा आदर करावासा वाटला. महिला क्रि केटपटूही विक्रमी कामगिरी करू शकतात, प्रसंगी विक्र मात पुरुष क्रि केटपटूंनाही त्या मागे टाकू शकतात असा विश्वास वाटावा, अशी कामगिरी मिताली राजने केली आहे.200 वन डे सामने खेळणारी भारतीय खेळाडू म्हणून तिचा गौरव अलीकडेच झाला. त्या रेकॉर्डच्या आणि बातम्यांच्या पलीकडे जाऊन मिताली राजची नोंद घेणं भाग आहे.मितालीने नुकताच वन डे कारकिर्दीतला 200 वा सामना खेळला. हा पल्ला गाठणारी ती जगातील पहिलीच खेळाडू ठरली. 19 वर्षे 218 दिवस; इतका प्रदीर्घ काळ ती भारतीय संघात खेळतेय. सलग खेळतेय. संघाला जोर्पयत आपली गरज वाटते तोर्पयत आपल्यातील शंभर टक्के देत राहण्याची तिची वृत्ती आजवर कायम आहे. संघात अनेक तरुण मुली आल्या मात्र ती आजही सार्‍यांची मितालीदीदी म्हणून खंबीरपणे खेळते आहे.अर्थात सध्याची युवा कर्णधार हरमनप्रीत कौरशी सारेकाही आलबेल नसेल, नाही. प्रसंगी त्यातून मितालीला संघाबाहेर बसावे लागले.  पण या गोष्टीचा तिने संघातील एकजुटीवर परिमाण होऊ दिलेला नाही. क्रिकेट सार्‍याच्या पुढे तिला ठेवता येतं.कारण क्रिकेट तिच्या आयुष्यात आलं तेच तिचं जगणं बदलायला. तसं ते बदलत गेलंही! खरं पाहता मितालीचं पहिलं प्रेम भरतनाटय़म होतं. त्याकाळी तिनं भरतनाटय़मचे कार्यक्र मही केले. वयाच्या दहाव्या वर्षी ती क्रि केट खेळायला लागली. क्रि केटकडे वळण्याचा किस्साही थोडा विचित्न आहे. मितालीला झोपा काढायची सवय. तिची ही सवय मोडण्यासाठी व ती सकाळी लवकर उठावी यासाठी तिच्या वडिलांनी तिला क्रि केट खेळण्यासाठी पाठवले. मितालीचे वडील दोराई राज हे भारतीय वायुसेनेत अधिकारी असल्यानं ते शिस्तीचे पक्के होते. त्यात मितालीचा भाऊ क्रि केट खेळायचा. मितालीची उशिरार्पयत झोपण्याची सवय मोडण्यासाठी क्रिकेट खेळणं सुरू झालं.पण हळूहळू ती क्रि केटच्या प्रेमात पडली. भरतनाटय़म व क्रि केट यांच्यापैकी एकाची निवड करणं हे तिच्यासमोरचं मोठं आव्हानचं होतं. एकच निवडायची वेळ आल्यावर तिनं क्रिकेटची निवड केली. मितालीचा जन्म राजस्थानातील असला तरी तिचे सर्व बालपण हे हैदराबादमध्ये गेलं. वयाच्या दहाव्या वर्षी तिनं क्रि केट खेळण्यास सुरुवात केली. 16 वर्षे 250 दिवस इतकं वय असताना भारतीय संघात तिनं स्थान पटकावलं. वन डे पदार्पणातच तिनं शतक ठोकलं आणि सर्वात कमी वयात शतक करणारी ती पहिली महिला क्रि केटपटू ठरली. रेल्वेकडून खेळताना तिला पुर्णिमा राव व अंजुम चोप्रा या अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन मिळालं. विसडेन क्रिकेटिअर ऑफ द इअर हा मानाचा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू. अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कारही तिला लाभले.हे सारं नोंदवणं का महत्त्वाचं आहे तर ज्या काळी आजच्या इतकं पाठबळ महिला क्रिकेटला नव्हतं, जेव्हा महिला क्रिकेट लाइव्हही दिसत नसे त्या काळाच्या खेळपट्टीवर मिताली टिच्चून उभी राहिली, परिस्थितीचे बाउन्सर डक करत राहिली, तेव्हा कुठं आजचे दिवस दिसत आहेत.आता काळ बदलला. महिला क्रि केटमधूनही कमाई होऊ शकते हे क्रिकेट धुरीणांच्या लक्षात आलं, आयसीसीने नियम बदलले, आता नव्या काळात महिला क्रिकेटपटूंचा झगडा तुलनेनं कमी झाला. मात्र महिला क्रिकेटला आपलं योगदान देणार्‍या मिताली, झुलन यांचं योगदान म्हणूनच पायाचा दगड ठरत आहे. 2017 सालचा एक किस्सा सांगावासा वाटतो. भारतीय महिला वन डे वर्ल्डकपचं उपविजेतेपद नावावर करून मायदेशी परतल्या. तेव्हा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्नकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी आयुष्यात प्रथमच आपल्याला ( पुरुष क्रिकेटपटूंना मिळते तशी) रॉयल ट्रीटमेंट मिळाल्याची भावना मितालीनही व्यक्त केली होती. 20 वर्षाच्या कारकिर्दीत ग्लॅमरच्या मागे ती कधी पळाली नाही, अजूनही ती तशीच आहे. मी मी करून मिरवणार्‍यांत मिताली कधी दिसली नाही. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू (अनुभवी झुलन गोस्वामी वगळता) मितालीचा खेळ पाहूनच मोठी झाली आहे. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही युवा पिढी घडली आहे. मितालीनं भारतीय महिला क्रिकेटचा पाया मजबूत केला. म्हणून तिची जागा खास आहे. संघातही, संघाबाहेरही!