शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

उंची वाढावी म्हणून जीममध्ये औषधं घेताय? सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 16:57 IST

ग्रोथ हार्मोनने उंची नक्कीच वाढते; पण याचे शरीरावर इतर जीवघेणे दुष्परिणाम होऊ शकतात हे एवढं तरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

- डॉ. यशपाल गोगटे

उंची कमी म्हणून येणारा न्यूनगंड, उंची कमी असण्याची कारणं आणि त्यावरील उपाय याबद्दल आपण मागच्या लेखात बोललोच. माणसाच्या उंची करता मुख्यतर्‍ जबाबदार असणारं हार्मोन म्हणजे ग्रोथ हॉर्मोन. मेंदूच्या तळाशी वाटाण्याच्या आकाराची असलेली पिटय़ुटरी ग्रंथी हे हार्मोन तयार करत असते. हे हार्मोन काही प्रमाणात आपल्या इतर अवयवांच्या वाढी करता गरजेचं असते. हे हार्मोन शरीरात जास्त झालं तर त्याचेही शरीरावर दुष्परिणाम  होतात.पिटय़ुटरी ग्रंथीतून तयार होणारं हे हार्मोन पेशींची वाढ करतं म्हणूनच त्याचं नाव ग्रोथ हार्मोन असं पडलं आहे. लिव्हरला क¬ऋ1नावाचं दुसरं हार्मोन तयार करण्यासाठी हे ग्रोथ हार्मोन प्रवृत्त करते. हे हार्मोन स्नायू, हृदय, हाडं यांच्या वाढीला मदत करते. त्यामुळे आपली उंची तर वाढतेच; पण बांधादेखील मजबूत होतो. अशारीतीने वयाप्रमाणे हे दोन्ही हार्मोन्स वाढत जातात व त्यामुळे एक विशिष्ट उंची आणि बांधा तयार होतो. कुपोषण व मानसिक ताण असल्यास त्याचा परिणाम लिव्हरच्या क्षमतेवर होतो व ग्रोथ हार्मोन जरी मुबलक असलं तरी IGF1 ची कमतरता निर्माण होते. त्यामुळे वाढीच्या काळात योग्य पोषक आहाराबरोबर मानसिक संतुलन सांभाळणंदेखील गरजेचं ठरते. या दोन्हीही गोष्टी मिळाल्यास वाढ योग्य प्रकारे होते.योग्य प्रमाणातील ग्रोथ हार्मोन- IGF1 वाढीसाठी उपयुक्त आहेच; परंतु त्याचं प्रमाण वाढलं तर त्याचेदेखील दुष्परिणाम होतात. पिटय़ुटरी ग्रंथीमधील टय़ुमर झाल्यास हे हार्मोन अधिक प्रमाणात वाढतं व या आजाराला अक्रोमेगाली असं म्हटलं जातं. जगभरात प्रसिद्ध असलेला डब्ल्यूडब्ल्यूएफचा खेळाडू खली यास हा आजार आहे. या आजारात उंची बरोबर, हात, पाय, स्नायू हाडे व जबडा या सगळ्यांची असामान्य वाढ होते.दुसरं म्हणजे ग्रोथ हार्मोनचा वाढीसाठी उपयोग होतो. त्यामुळे अलीकडच्या काळात ग्रोथ हार्मोनच्या इंजेक्शनांचा जिम व खेळाडूंमध्ये गैरवापर वाढू लागला आहे. साधारणतर्‍ पिटय़ुटरी टय़ुमरमुळे होणार्‍या अक्र ोमेगाली या आजारासारखी लक्षणं या गैरवापरामुळेदेखील दिसायला लागली आहेत. त्यामुळे खेळाडूला त्यापासून फायदा तर होत नाहीच उलट नुकसानच होते.अक्रोमेगाली या आजारात काही विशेष लक्षणं दिसतात. या शब्दाचा जणू अर्थच म्हणजेच अक्रो म्हणजे बोटे व मेगाली म्हणजे मोठी ! लहान मुलांमध्ये त्यांच्या असामान्य उंचीवरून हा आजार ओळखला जाऊ शकतो. या आजारातील व्यक्तींचे पंजे मोठे असतात व बुटाचा नंबर विसाव्या वर्षानंतरदेखील वाढतो. काही लोकांच्या खालच्या जबडय़ामध्ये असामान्य वाढ दिसते. खासकरून स्त्रियांमध्ये पाळीचे आजार व गर्भधारणा न होणं हेदेखील या आजाराचं लक्षण आहे. प्रचंड सतत डोकेदुखी, घामाचा अतिरेक, गुडघे व सांधेदुखी हीदेखील या आजाराची लक्षणे असू शकतात. ग्रोथ हार्मोन- क¬ऋ1 अधिक मात्नेत असल्यास ते कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.सर्वसाधारणपणे हा आजार आढळून येत नाही त्यामुळे अनेकवेळा याचं निदान होण्यास उशीर होतो. वेळेत निदान झाल्यास योग्य उपचाराने हा नियंत्नणात ठेवता येतो. अधिक ग्रोथ हार्मोनने उंची नक्कीच वाढते; पण याचे शरीरावर इतर जीवघेणे दुष्परिणाम होऊ शकतात हे एवढं तरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.हा आजार अधिक सामान्य नसला तरीही उंचीच्या व शरीरवाढीच्या हव्यासापोटी या ग्रोथ हार्मोनचा गैरवापर वाढला आहे. अवैध परंतु सहज उपलब्ध असलेल्या या ग्रोथ हार्मोनचा गैरवापर जिम व क्रीडाक्षेत्नात वाढलेला आढळतो. या गैरवापरामुळे आजार नव्हे; पण आजारासदृश दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. त्यामुळे त्यापासून दूर रहावेच आणि मित्रांना यापासून परावृत्त करावं.