कानात खडय़ांची नाजूक सर

By Admin | Updated: June 4, 2015 14:03 IST2015-06-04T14:03:33+5:302015-06-04T14:03:33+5:30

कानातले म्हणजे फॅशन स्टेटमेण्ट असा विचार करतो का आपण?

The fragile head of the stones in the ear | कानात खडय़ांची नाजूक सर

कानात खडय़ांची नाजूक सर

- मुली भारंभार कानातले विकत घेतात. कधीही-कुठंही कानातले दिसले की घेतले.
आणि ऐनवेळेस घालायचं म्हटलं तर एक कानातलं काही मिळणार नाही.
पण हे सारं करताना आपण कानातल्यांचा फॅशन स्टेटमेण्ट म्हणून काही विचार करतो का?
कुठलाही रिअॅलिटी शो बघा, विशेषत: कमीत कमी दागिने घालून केवळ कानातल्यांवर सगळा स्टेटमेण्टचा भार सर्रास टाकला जातो.
आणि सध्या तर कानातलेच घालायचे आणि गळ्यातल्या सुट्टी असा एक नवा ट्रेण्ड आहे.
आणि त्यासाठीच सध्या तीन प्रकारचे कानातले चर्चेत आहेत.
त्याचीच ही एक झलक
 
1) कानाभोवती मोती
कानाच्या पूर्ण कडेभोवतीच, पाळीभोवती एक मोठ्ठं कानातलं घातलं जातं. त्याला इंग्रजीत म्हणतात, इयर कफ. 
कानाला चिकटलेलं हे कानभर कानातलं. गळाबंद ड्रेस, फॉर्मल्स यावरही हे नाजूक खडय़ांचे कफ घातले जातात.
मुख्य म्हणजे अनेकजणी तर दोन्ही कानात हे कफ न घालता फक्त एका कानात कफ आणि दुस:या कानात फक्त एक खडा अशीही स्टाइल करतात. ती सध्या चर्चेचा विषय आहे.
 
2) कानात लांबच लांब खडय़ांची माळ
बारीक खडय़ांची सर असावी तसं हे खांद्यार्पयत लोंबणारं कानातलं.
एक नाजूक सर फक्त कानात घालतात. दुस:या कानात एक बारीक खडा. संध्याकाळचं फंक्शन, पार्टी यासाठी हे कानातले वापरतात.
 
3) कानात श्ॉण्डिलीअर
मोठ्ठे मोत्यांचे किंवा खडय़ांचे झुमके, मिना काम केलेले कानातले, भरगच्च मोठे कानातले हा सध्या सगळ्यात पॉप्युलर ट्रेण्ड.
हे मोठ्ठाले कानातले घातले की गळ्यात मात्र काही घालायचं नाही. केस उंच बांधायचे. एक वेगळा लूक तयार!
 
- अंकिता माळी

 

Web Title: The fragile head of the stones in the ear