शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

फोमो

By admin | Updated: April 28, 2016 13:30 IST

सोशल मीडिया वर्तणुकीचे असे कितीतरी प्रकार लिहिता येतील. या साऱ्यांनाच मानसशास्त्रीय भाषेत पॅसिव्ह अ‍ॅग्रेशन म्हणजेच निष्क्रिय आक्र मकता असं म्हणतात.

- मुक्ता चैतन्य( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

मला पहा फुलं वहाअसं डायरेक्ट तर म्हणता येत नाही.पण लोकांनी आपल्याला भाव तर दिला पाहिजेम्हणून मग काही माणसं सतत इतरांना चिमटे काढतात,वाद घालतात, झुंजी लावतात, नाहीतर मग सतत मी कसा गरीब बिचारा, माझ्यावर कसा अन्याय होतोयम्हणून मलम मागत राहतात.आपण ‘लेफ्ट आउट’ होऊनसायडिंगला लागू नये म्हणून हा अट्टहास!सोशल मीडिया वर्तणुकीचे असे कितीतरी प्रकार लिहिता येतील. या साऱ्यांनाच मानसशास्त्रीय भाषेत पॅसिव्ह अ‍ॅग्रेशन म्हणजेच निष्क्रिय आक्र मकता असं म्हणतात. माणसं प्रत्यक्ष जे वागणार नाहीत तेच वागतात. पण त्याला एक नकारात्मकतेची किनार असते. काहीवेळा तर लोक टोकाचे नकारात्मक असू शकतात. माणसांमधल्या सकारात्मक भावना जशा सोशल नेटवर्किंगवर बघायला मिळतात, तशाच नकारात्मक भावनाही मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत असतात. 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून अजिबात संवाद न साधणं, कुणी मेसेज केला तरी त्याला उत्तर न देणं, शुभेच्छांची दखल न घेणं, कुणातरी एकाच व्यक्तीला जाणूनबुजून टाळत राहणं किंवा इग्नोर करणं, कुठल्याही चर्चेत फक्त भांडण करण्यासाठी सहभागी होणं, सतत इतरांशी स्वत:ची तुलना करत राहणं, आपण कसे दुर्दैवी याचा पाढा वाचत राहणं, सतत गोंधळलेल्या अवस्थेत असणं आणि स्वत:च्या पोस्टने इतरांना गोंधळून टाकणं किंवा इरीटेट करणं, सगळ्यांकडून अतिरेकी अपेक्षा करणं आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर इतरांना अप्रत्यक्ष दूषणं देत राहणं, सतत विविध गोष्टींसाठी कारणं देत राहणं, आपल्यावर कसा अन्याय झाला आहे याच भूमिकेतून सतत वावरणं आणि दुसरी बाजू बघायला नकार देणं, आपण किती दुर्दैवी आहोत याचा सतत पाढा म्हणणं, दुसऱ्यांना दोषी ठरवून गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करणं आणि सतत दु:ख कुरवाळत इतरांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत राहणं ही निष्क्रिय आक्र मकतेचीच उदाहरणं आहेत. बारकाईने विचार केलात तर अशा प्रकारे वागणारे अनेकजण सोशल मीडियावर बघायला मिळतात.

 

ज्यावेळी आपण सोशल मीडियावर असतो तेव्हा कुठेतरी आपल्याला खात्री असते की आपल्याला संरक्षण द्यायला कम्प्युटर किंवा मोबाइलचा स्क्र ीन आहे. काय करावं आणि काय नाही याचे जे काही संकेत असतात ते अशावेळी गळून पडतात. आणि मग नकारात्मक भावनाही बाहेर पडायला सुरु वात होते. अनेकांना फोमोची (ऋडटड) बाधा होते. 

 

फोमो म्हणजे ‘दि फिअर आॅफ मिसिंग आउट’. लोक आपल्याला विसरतील, आपल्याला बोलावणं येणार नाही, आपल्याला कुणी काहीच म्हणणार नाही या भीतीपोटी लोक नकारात्मक पद्धतीने प्रतिसाद द्यायला लागतात. ही नकारात्मकता इतकी वाढत जाते की त्यातून ही माणसं स्वत:भोवती नकाराचं एक वर्तुळच तयार करतात. इतरांना अप्रत्यक्षपणे नावं ठेवताना आपणही कधीतरी दुसऱ्या बाजूला असू शकतो हे ही माणसं विसरतात आणि मनातला राग, द्वेष वर्तणुकीतून व्यक्त करत राहतात. ही माणसं थेट शिव्या घालत नाहीत. अद्वातद्वा बोलत नाहीत. त्यामुळे एखादी व्यक्ती या प्रकारात मोडणारी आहे हे चटकन लक्षात येऊ शकत नाही. पण त्यांच्या सोशल मीडियातल्या वर्तणुकीकडे बारकाईने बघितले की लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. या लोकांना कशाचाच आनंद नसतो, कशाचंच कौतुक नसतं. दुसऱ्याला चटकन चांगलं म्हणवत नाही, ते काही न बोलता लांबून बघत राहतात आणि मनातली गरळ हळूच ओकून मोकळे होतात. त्यांना सतत इतरांच्या चुका शोधण्याचा छंद जडलेला असतो. निष्क्रिय आक्र मकतेतून निर्माण होणारी नकारात्मकता चटकन दिसत नाही, पण पसरते मात्र पटकन! १.व्यावसायिक आयुष्यात कुणाचं कुणाशीतरी वाजलं, मतभेद झाले किंवा अपेक्षित काम करून मिळालं नाही तर हा जो ‘कुणी’ आहे तो ‘कुणाशी’ विषयी सोशल मीडियावर नाही नाही ती गरळ ओकतो. व्यावसायिक आयुष्यातले मतभेद चव्हाट्यावर आणतो. अर्थात हे आणत असताना तो ‘कुणाशी’चं नाव घेत नाही, की त्याला नावानं टॅग करत नाही. पण लिहिताना अशा पद्धतीने लिहितो की साऱ्या जगाला समजतं कुणी कुणाविषयी काय लिहिलं आहे.२.प्रियकर. प्रेयसी.काही कारणांनी ब्रेकअप झाला की, एकमेकांविषयी जाहीर सभा घेतल्यासारखे किंवा सतत जाहीर कुचाळक्या करत एकमेकांविषयी वाईटसाईट बोलत राहतात. तेही एकमेकांचे नाव न घेता. आनंदाचे जे काही क्षण त्यांनी एकत्र घालवलेले असतात त्याबद्दलचा आदर क्षणार्धात संपून जातो. पुन्हा एकमेकांचे नाव घेऊन लिहिण्याची हिंमत नसते. त्यामुळे आडूनआडून टोमणे मारण्याचा कार्यक्र म होतो आणि अर्थातच ते वाचून जगाला मज्जा येते. हे कमी म्हणून की काय, यातल्या प्रेयसीवर मरणाऱ्या दुसऱ्या कुणाच्या तरी लक्षात येतं की, आता आपल्याला चान्स आहे. आणि प्रेमातलं पहिलं अपयश पचवायला वेळ न देता हा दुसरा लगेच तिला सहानुभूती देण्यासाठी पुढे सरसावतो. आडून आडून प्रेमभावना सांगायला लागतो. जरा थांबण्याची, विचार करण्याची फुरसत त्याला नको असते.३.कसली तरी घमासान चर्चा चालू आहे. लोक एकमेकांशी वाद घालत आहेत. अशावेळी चर्चेत अशीही काही मंडळी असतात जी प्रत्यक्ष सहभाग घेत नाहीत, मात्र मागून चर्चा करणाऱ्यांविषयी बोलत राहतात. किंवा काहीतरी गंभीर चर्चा चालू असताना मध्येच कसला तरी फालतू जोक टाकतात. एखादा स्मायली अगदीच चुकीच्या वेळी पोस्ट करतात. किंवा चर्चेत सहभागी होणाऱ्यांबद्दल स्वत:च्या वॉलवर नाव न घेता वाईटसाईट लिहित राहतात. ४.कुठल्याही आणि कसल्याही पोस्टला लाइक मारणारे तर अगणित असतात. कुणाचे पालक वारले, कुणी जोडीदार गमावला, कुणाला अपघात झाला, कुणा थोर व्यक्तीची पुण्यतिथी अशा कसल्याही पोस्टना ते फक्त लाइक करतात. एखाद्या पार्टीचं आमंत्रण नाही, एखाद्या सोहळ्याला जायला मिळालं नाही, एक्सचं लग्न, साखरपुडा.. कारण काहीही असो, मनातला मत्सरही अनेकांना अनेक गोष्टी लाइक करायला भाग पाडतो.